शुभा प्रभू साटम

साहित्य :

आंबा, अर्धी वाटी बार्ली, मध, मीठ, लिंबू रस, जिरे पूड, मिरपूड.

कृती

बार्ली स्वच्छ धुऊन दहाएक मिनिटे भिजवून ठेवावी. मग किंचित उकडून घ्यावी. दहा मिनिटांत शिजते. तर ही शिजलेली बार्ली काढून बाजूला ठेवावी. आंब्याचे साल काढून मध्यम आकाराच्या फोडी करून ठेवाव्या. ड्रेसिंगसाठी मध, मीठ, लिंबूरस, मिरपूड, जिरे पूड हे एकत्र करून फेसून घ्यावे. बार्ली आणि आंब्याचे तुकडे एकत्र करून त्यात हे ड्रेसिंग ओतून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. याला डी-टॉक्स सॅलड म्हणतात.  आंब्याऐवजी त्या मोसमातील कोणतेही फळ वापरू शकता तसेच मिरपूड आवडत नसेल तर लाल तिखटही वापरता येईल.