News Flash

आरोग्यदायी आहार : बीट-नारळ बर्फी

कढई मंद आचेवर तापवून त्यात दोन मोठे चमचे तूप टाकावे.

बीट-नारळ बर्फी

डॉ. सारिका सातव

साहित्य

साल काढून किसलेले बीट १ वाटी, किसलेला ओला नारळ १ वाटी, साखर २ वाटय़ा, तूप दोन मोठे चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, बदाम-पिस्ता-काजूचे लांब तुकडे किंवा पूड दोन मोठे चमचे.

कृती

* कढई मंद आचेवर तापवून त्यात दोन मोठे चमचे तूप टाकावे.

* तूप पातळ झाल्यावर त्यात बीटाचा किस टाकून परतवून घ्यावा.

* त्यात किसलेला नारळ टाकून पुन्हा परतवून घ्यावा.

* साखर घालावी.

* मिश्रण घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या ताटामध्ये घेऊन पातळसर थापावे.

* वडय़ा पाडून थंड होऊ द्यावे.

* पूर्ण थंड झाल्यावर वडय़ा मोकळ्या कराव्यात

वैशिष्टय़े

* लहान मुले, कृश व्यक्ती, रक्ताची कमतरता असलेल्यांसाठी अतिशय उत्तम पदार्थ.

* रंग आकर्षक असल्यामुळे लहान मुले आवडीने खातात.

* यात क जीवनसत्त्व आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.

* पदार्थ तीन-चार दिवस टिकतो.

* याच्या सेवनामुळेत्वचेचा पोत सुधारतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:58 am

Web Title: beetroot coconut barfi recipe for loksatta readers
Next Stories
1 योगस्नेह : अर्धचक्रासन
2 शक्तिशाली स्पीड ट्वीन
3 मस्त मॉकटेल : आइस्ड चॉकलेट
Just Now!
X