चिंब भिजत भटकायचा काळ सुरू झालाय. प्रत्येक वीकेंड खिशात टाकायचा तर नियोजन तयारच ठेवायला हवं. शनिवार-रविवारी कुठे जाता येईल, याचे पर्याय खास भटक्यांसाठी.. आज भंडारदऱ्याला जायचा प्लॅन करूया

शनिवार

buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
Fire Breaks Out at Atharva Agrotech Industry Project in Buldhana near khamgaon midc
खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

अहमदनगर जिल्ह्य़ातील, पण नाशिक जिल्ह्य़ाच्या सीमेजवळ असलेलं भंडारदरा गाठावं. पुण्याहून संगमनेरमार्गे पोहोचता येतं. मुंबई किंवा नाशिकहून इगतपुरीमार्गे भंडारदरा गाठावं. इथे प्रवरा नदीवर बांधलेलं ब्रिटिशकालीन विल्सन धरण आहे. मुक्कामासाठी एमटीडीसीसह अन्यही काही पर्याय आहेत. तिथला रंधा धबधबा हे भन्नाट ठिकाण आहे. समोरच एक बेट दिसतं, तिथे चुकूनही जाऊ  नये. प्रवाह वाढला की ते बेट पाण्याखाली जातं. रंधा धबधबा, अंब्रेला खडक बघून सरळ रतनवाडी गाठावी. अमृतेश्वर मंदिर पहावं. डोंगर चढायची तयारी व किमान एक दिवस हातात असेल तरच रतनगडावर जावं. किल्ल्यावर नेढे, प्रवरेचा उगम असलेली गुहा, राणीचा हुडा नक्की बघावं. नाहीतर अमृतेश्वर मंदिर पाहून साम्रदमार्गे घाटघर गाठावं. तिथे विद्युत प्रकल्प पाहावा.

रविवार

टाकेदकडे जावं. पाऊस नसेल तर कळसुबाईला भेट द्यावी. मात्र डोंगर चढायचा सराव हवा. नाहीतर जटायू मंदिर बघावं. तसंच पुढे इगतपुरीला जाऊन त्रिंगलवाडी, कावनई परिसर हिंडावा. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याला असलेली जैन लेणी पहावीत, तसंच कावनईचा आश्रम बघून परत यावं. किंवा अकोले येथील सिद्धेश्वर मंदिर पाहावं. तिथले एकदम फिके आणि अति गोड असे दोन्ही प्रकारचे पेढे मात्र अवश्य खावेत. १०० ग्रॅम वजनाचा एकेक पेढा खाल्ला की जेवायची गरजच रहात नाही. किंवा दुसरा दिवस भंडारदरा जलाशयाच्या काठी घालवावा. एवढय़ा मोठय़ा जलाशयावर पावसाचं आगमन बघत बसणं हेसुद्धा रमणीय असतं.

ashutosh.treks@gmail.com