टेस्टी टिफिन : शुभा प्रभू साटम

साहित्य

१ वाटी साधी बुंदी, अर्धी वाटी दही, बेसन, आलं, मिरची, हळद, गरम मसाला, धने-जिरेपूड, लाल तिखट, आमचूर, मीठ, तूप, फोडणीसाठी जिरे, कलौंजी, हिंग आणि कढीलिंब.

कृती

दह्य़ामध्ये थोडेसे बेसन कालवून घ्या. एकीकडे तूप तापवून त्यात जिरे, कलौजी, हिंग आणि कढीलिंब यांची फोडणी करा. त्यात आलं, मिरची आणि बाकीचे मसाले घालून परता आणि थोडे पाणी घाला. या पाण्याला एक उकळी आली की त्यात बेसन लावलेले दही घाला आणि ढवळून त्यात बुंदी सोडाव्या. शेवटी मीठ घालून एक लहानशी उकळी आणावी. सजावटीसाठी वरून कोथिंबीर पेरा.  या भाजीमध्ये तुम्ही कांदा, लसूण किंवा टोमॅटो आवडीप्रमाणे घालू शकता. भाजी घट्ट पातळ जशी हवी, त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण ठरवावे. ही भाजी नंतर घट्ट होते. पारंपरिक राजस्थानी पद्धतीत या भाजीत पापड घालतात.