06 April 2020

News Flash

दुचाकींचे तरंगक

खड्डेयुक्त रस्त्यांवर वाहनचालक आणि सहप्रवाशाला आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळणे

|| तंत्राचा मंत्र : उदयन पाठक

(Two Wheelers Suspensions  )

दुचाकींच्या तरंगकांची (Suspensions) ) महत्त्वाची उद्दिष्टे म्हणजे वाहन चालवताना स्थैर्य असणे, अवरोध लावल्यावर वाहनाचा तोल सांभाळणे आणि खडबडीत तसेच खड्डेयुक्त रस्त्यांवर वाहनचालक आणि सहप्रवाशाला आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळणे. दुचाकीच्या तरंगकाची रचना साधारणत: पुढील बाजूस दोन दुर्बीणसदृश नळ्यांची आणि मागील बाजूस हलणाऱ्या भुजांवर ((Swingwarm)) एक किंवा दोन धक्कारोधके(Shock Absorbers) ) अशी असते. नवीन पद्धतीच्या आरेखनांमध्ये (Designs) मागील बाजूस एकाच किंवा एकल धक्कारोधकाची (Single or Mono Shock Absorber)  वापर केला जातो, कारण त्यामुळे दुचाकी जास्त दिखाऊ  आणि आकर्षक होतात तसेच तरंगकाच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

पारंपरिक दुर्बीणसदृश अग्र चिमटय़ाची (Telescopic Front Forks) रचना सुटसुटीत असून त्यात द्रवशक्तीवर (Hydraulic Power) )कार्यरत दोन लांब नळ्या एकात एक असतात आणि त्यामध्ये वेटोळे स्प्रिंग असतात. ह्यात खालच्या नळीत वरची नळी मागे-पुढे सरकते. आतील द्रव तेल ((Hydraulic Oil) ) धक्कारोधकाचे कार्य जास्त प्रभावी करते. नवीन उच्च दर्जाच्या दुचाकींमध्ये धक्कारोधके उलटी बसवतात. ह्यात वरच्या नळीत खालची नळी वर खाली होत असते. ह्या रचनेत दुचाकीचा पिळीव कडकपणा (Torsional Stiffness) वाढून वाहन चालवणे सोपे होते.

एकल धक्कारोधक

मागील तरंगकांच्या रचनेतील आयताकृती चतुर्भुजाची लहान बाजू फटफटीच्या चौकटीला जोडली असते, तर दुसऱ्या बाजूला मागील चाकाचे आस असते. अनेक फटफटय़ांमध्ये एकाच बाजूला हलणारी भुजा असते. ह्यत रचनेत मागचे चाक काढणे सोपे जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:09 am

Web Title: bike ripper two wheelers suspensions akp 94
Next Stories
1 ट्रँफिक सेन्स…
2 देवालयांमधील ‘चक्रवर्ती’
3 प्रेमाचे ‘ड्रीम कॅचर’
Just Now!
X