राजेंद्र भट

गॅलरीच्या ग्रिलवर कारल्याचा वेल लावता येतो. वर्षभरात केव्हाही कारले लावता येते. ही नाजूक वेल असते.  कारल्याचे रंगावरून दोन प्रकार पडतात. साधारण मोठय़ा कुंडीत फांद्यांचे तुकडे नारळाच्या शेंडय़ा सुकी पाने, उसाची चिपाडे आणि खतमिश्रित माती भरावी. हे प्रकार लवकर, मध्यम काळात आणि हळूहळू कुजणारे आहेत. त्यामुळे मातीतून झाडाला हवी ती द्रव्ये मिळतात. कुंडीत हंगामानुसार पालेभाजीचे बी पेरावे. मोठय़ा आकाराच्या पालेभाजीचे म्हणजे पालक, मेथीचे चमचाभर बी पुरते. तर माठ वर्गातील पालेभाजीचे अर्धा चमचा बी पुरते. हे बी मातीत मिसळून झाल्यावर त्यात आपण निवडलेल्या कारल्याच्या २-३ बिया पेरभर खोल पुराव्यात. त्याला हलके पाणी द्यावे.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

आधी पालेभाजी उगवते आणि नंतर कारल्याचे रोप येते. पालेभाजी २०-२५ दिवसांत तयार होते. ती काढताना एखादा इंच वर ठेवून कापावी. पालक, माठ यांची पाने काढून घ्यावीत. तोपर्यंत कारल्याचा वेल वाढून त्याला तणावे आलेले असतील. वेलाला आधार द्यावा. जी वेल सर्वात चांगली वाढलेली असेल, ती ठेवून बाकीच्या मातीजवळ कापून टाकाव्यात. ठेवलेल्या वेलीचा शेंडा कापावा. त्यानंतर आठवडय़ाभरात बगलफुट फुटू लागते. त्यावेळी एका शेंडय़ाऐवजी दोन-तीन फुटाव्यांचे शेंडे येतात. हे फुटावे एक-दीड फूट वाढल्यावर शेंडे खुडावेत. त्या फांद्यांमधून पुन्हा बगलफूट फुटू लागते. बी लावल्यापासून ५०-६० दिवसांत कारल्याला फुले येऊ लागतात. पहिली काही फुले नर फुले असतात. नंतर मादी फुले येतात. त्यांच्यामागे फळ दिसते. फुलाचे परागीभवन झाल्यास फळ मोठे होऊ लागते.

कारल्याच्या वेलाला दोन रोग होऊ शकतात. भुरी आणि केवडा. पाणी जास्त झाल्यास हे रोग होण्याची शक्यता जास्त असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक लिटर पाण्यात एक कप गोमूत्र मिसळून त्याची फवारणी करावी. फळमाशी नावाची कीड लागते. तिच्या नियंत्रणासाठी फळमाशीचा सापळा आणून लावावा.