|| डॉ. वृषाली सूरवाडे-सावंत
गाल आणि नाकावरील काळे डाग हा वांग असू शकतो. तेव्हा आधी हे वांग आहे का याची डॉक्टरांकडून खात्री करून घेऊनच उपचार सुरू करणे योग्य आहे.
- गर्भधारणेनंतर किंवा रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोन्स बदलामुळे शक्यतो हे डाग दिसून येतात.
- प्रखर उन्हामुळे हे डाग अधिक काळे दिसतात. त्यामुळे असे डाग आलेल्या व्यक्तीने नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावूनच उन्हात जावे. ३० ते ५० एसपीएफ असलेले सनस्क्रीन सकाळी आणि दुपारी न चुकता लावावे.
- त्वचारोग विशेषतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे आणि मलमचा वापर केल्यास हे डाग कमी होतात.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून फार्मासिस्टकडून घेऊन मलमचा वापर करू नये. अशा रीतीने स्टिरॉईडयुक्त मलमचा वापर केल्यास त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता अधिक असते.
- डागांसाठी टी ट्रेल ऑइल, कोजीक अॅसिडयुक्त मलमचा वापर केल्यास डाग कमी होण्यास मदत होते.
- केमिकल पील आणि मायक्रोड्रम अब्रेशॅन या प्रक्रियांनी डाग फिकट होण्याची शक्यता असते.
- वांग कमी करण्यासाठी आता इंजेक्शनच्या रूपात नवीन उपचार उपलब्ध आहेत.
- मलमच्या वापराने सुधारणा होत नसल्यास क्यू स्विच एनडी यॅग या लेसर पद्धतीचा वापर करून डाग घालवणे शक्य आहे.
- उपचारांनंतर सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक असते. असे न केल्यास डाग पुन्हा काळे होण्याची शक्यता असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 12:45 am
Web Title: black spots on face