‘शास्त्र’ असतं ते.. मनीषा बायस-पुरभे  मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

उत्तर : रक्तात असणाऱ्या हिमोग्लोबिन या प्रथिनामुळे आपल्या रक्ताचा रंग लाल होतो. हिमोग्लोबिनमध्ये ‘हीम’ हा लाल रंगाचा घटक असतो. हिममध्ये असणारे लोह हे ऑक्सिजनबरोबर क्रिया करून शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करतो. लोहात लाल रंग परावíतत करू शकण्याची क्षमता असते. तसे बघता एखादी वस्तू आपल्याला विशिष्ट रंगाची का दिसते? प्रकाशकिरण त्या वस्तूवर पडल्यावर काही किरणे ती वस्तू परावर्तित करते तर काही शोषून घेते. जो रंग ती (विशिष्ट रंगाची तरंगलांबी (वेव्हलेंथ ) असणारे किरण) वस्तू परावर्तित करते त्या रंगाची ती वस्तू आपल्याला दिसते. ऑक्सिजनबरोबर असणारा हिमोग्लोबिनचा रेणू निळा व हिरवा रंग शोषून घेतो व लाल रंगाला परावर्तित करतो म्हणून आपल्याला रक्त तांबडय़ा रंगाचे दिसते.

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

इंद्रधनुष्य कसे तयार होते?

उत्तर : पाऊस पडून गेल्यावर थोडय़ा प्रमाणात पाण्याचे थेंब वातावरणात असतात व जेव्हा अशा स्थितीत सूर्यप्रकाशाची किरणे त्या थेंबावर पडतात तेव्हा प्रत्येक थेंब हा प्रीझमसारखा वागतो व सूर्यकिरणे सात रंगांच्या वर्णपंक्तीत विभागली जातात. इंद्रधनुष्य दिसण्यासाठी सूर्य हा पाहणाऱ्याच्या मागच्या बाजूस तर पाण्याचे थेंब हे समोरील विरुद्ध बाजूस असणे आवश्यक असते.

जेव्हा प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा आपला मार्ग बदलतो. यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. येथे प्रकाशकिरण थेंबात प्रवेश करतो तेव्हा त्याचे माध्यम बदलते ( हवेतून पाण्यात ) व त्याचे अपवर्तन घडून येते व त्याच वेळेस प्रकाशकिरण सात रंगांच्या वर्णपंक्तीत (तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा)  विभाजीत होतो म्हणजेच प्रकाशाचे अपस्करण घडून येते. सूर्यकिरण जसा एकाच रंगाचा भासतो तसा तो नसतो. विविध रंगांचा हवेतील वेग सारखाच असतो पण माध्यम बदलले (येथे पाणी ) तर मात्र त्याचा वेग वेगवेगळा असतो व म्हणून किरणांचे वक्रीभवन होते. म्हणून पाण्याच्या थेंबात प्रकाशकिरण शिरल्यावर सात रंगाच्या वर्णपंक्तीत विभागाला जातो. व थेंबात जेथे प्रकाशकिरण प्रवेश करतो त्याच्या आतील विरुद्ध बाजूस वर्णपंक्तीचे संपूर्ण आंतरिक परावर्तन होते व थेंबातून बाहेर पडताना पुन्हा प्रकाशकिरण अपवर्तन पावतो. असे अनेक थेंब वातावरणात असल्याकारणाने एकत्रितरीत्या इंद्रधनुष्य ही सुंदर घटना आपल्याला अनुभवायला मिळते.