|| अमित सामंत 

स्लोव्हाकियाची राजधानी ब्राटिस्लाव्हाच्या जुन्या गावात फिरताना अनेक रेस्टॉरन्ट्स दिसत होती. थोडी शोधाशोध केल्यावर ब्रेड बाउल गार्लिक सूप हे ब्राटिस्लाव्हियन पारंपरिक जेवणात वापरले जाणारे सूप मिळाले. थंडीच्या दिवसात ऊब येण्यासाठी आणि शरीरातील उष्मांक वाढवण्यासाठी हे सूप केले जाते. हे सूप दोन प्रकारांत मिळते प्लेन सूप आणि क्रिम सूप. लसूण, स्मॅश केलेले बटाटे, पॅप्रिका, चिज आणि क्रिम वापरून हे सूप केले जाते. शहाळ्याच्या आकाराच्या आपल्याकडे मिळणाऱ्या ब्रून ब्रेडसारख्या कडक ब्रेडमध्ये हे सूप दिले जाते.

  • गरमागरम सूप पिऊन झाल्यावर ब्रेड बाऊल खाल्ले की पोट भरून जाते.
  • खाण्यायोग्य ब्रेड बाऊल तयार करून तिथल्या चाणाक्ष गृहिणींनी थंडीच्या दिवसांत थंड पाण्याने भांडी घासण्याचा त्रास वाचवला आहे.
  • प्लेन सूपमध्ये क्रिम घालत नाहीत. ते ब्रेड बाऊलमध्ये न देता साध्या बाऊलमध्ये देतात.
  • या सूपमध्ये ब्रेडचे तळलेले तुकडे टाकलेले असतात.