13 December 2019

News Flash

टेस्टी टिफिन : ब्रेड उत्तप्पा

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, सिमला मिरची बारीक चिरून घ्या. गाजर बारीक किसून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

 शुभा प्रभू साटम

साहित्य :

*   ब्रेडचा चुरा

*   कांदा

*   टोमॅटो

*   कोथिंबीर

*   सिमला मिरची

*   गाजर

*   रवा

*   दही

*   मीठ

कृती

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, सिमला मिरची बारीक चिरून घ्या. गाजर बारीक किसून घ्या. आता ब्रेडचा चुरा, रवा आणि दही एकत्र करून अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर त्यात चिरलेल्या भाज्या, गाजर, मीठ घालून सरसरीत पीठ भिजवावे. त्याचे छोटे छोटे उत्तप्पे करावेत.

First Published on August 9, 2019 12:21 am

Web Title: bread uttapam recipe abn 97
Just Now!
X