कार किंवा टू व्हीलरची देखभाल आणि स्वच्छता हा नेहमीच कटकटीचा मुद्दा असतो. हवेतील प्रदूषण, आद्र्रता आणि धूळ हे घटक गाडी कुरूप करण्यात भर पाडतात, विशेषत: महामार्गावरून प्रवास करताना अगदी छोटे छोटे धूलिकण गाडीला घट्ट चिकटून बसतात. वेळीच स्वच्छ न केल्यास या कणांचे हळूहळू थर साचत जातात आणि त्यामुळे गाडी केवळ अस्वच्छच होत नाही, तर तिचा रंग आणि चमकही उडू लागते. म्हणूनच गाडीची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक बनते. तेव्हा एकतर गाडी सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये घेऊन जाणे किंवा आठवडा-पंढरवडय़ातून एकदा घरीच गाडी स्वच्छ करणे हेच पर्याय राहतात.

गाडी साफ करायला काही लोक उत्साहाने तयार होतात. सुटीचा दिवस ते या कामासाठी राखून ठेवतात. पण गाडीला व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी एक तासाचा कालावधी जातो. सध्या ऑटोमॅटिक कार वॉश सेंटर सुरू झाल्यामुळे काही लोक त्या पर्यायाचा देखील वापर करीत आहेत. गाडीला चकचकीत करण्यासाठी अनेक विशेष उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. काही कंपन्या कार स्वच्छ करण्याचे किट तयार करतात. घरच्या घरी गाडीची स्वच्छता करण्यासाठी अनेक विशेष उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. या किटमध्ये कार श्ॉम्पू, प्रीमियम फिनिश कम्पाऊंड, क्रीम पॉलिश आणि डॅशबोर्ड पॉलिश अशा प्रकारची उत्पादने दिली जातात.

Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ

आता गाडी स्वच्छ कशी करावी याबरोबर ती स्वच्छ कशी ठेवावी याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. याची सुरुवात गाडी उभी करण्याच्या जागेपासून करायला हवी. प्रत्येकाकडे पार्किंगची स्वतंत्र जागा किंवा स्वतंत्र गॅरेज नसते. गाडी घरासमोर उभी करायची असल्यासही सावली असणाऱ्या भागात ती उभी करणे योग्य. गाडी सतत सूर्यप्रकाशात ठेवणे हे धोकादायक ठरू शकते. झाडाखाली गाडी लावताना पक्ष्यांचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. गाडीला कव्हर लावणे हादेखील गाडीला सुरक्षित ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. परंतु बरेच लोक गाडीवर कव्हर घालायला कंटाळा करतात. या कामासाठी दोन मिनिटांचा कालावधीदेखील पुरेसा असतो. यामुळे गाडीच्या पेंटचे संरक्षण होते. म्हणून नियमित गाडीवर कव्हर घालत चला. गाडी साफ करताना साधे सफाईचे फडके किंवा जुने कपडे वापरल्याने गाडीवर ओरखडे उठण्याची शक्यता असते. म्हणून मायक्रो फायबर कपडय़ाचा वापर करावा. यासोबतच सहा महिन्यांतून एकदा किंवा वर्षांतून एकदा क्लीनिंग सेंटरमध्ये जाऊन गाडी स्वच्छ करून घेणेदेखील महत्त्वाचे ठरते. यामुळे तुमची गाडी जास्त काळ चकचकीत ठेवण्यात मदत होते.

फिनिशिंग कम्पाऊंड

गाडीला घट्ट चिकटून बसलेले धूलिकण, छोटे ओरखडे, रंगदोष हटवण्यासाठी फिनिश कम्पाऊंड अतिशय उपयुक्त ठरते. कम्पाऊंडचा वापर ज्या ठिकाणी घट्ट माती किंवा ओरखडे असतील त्यावर करावा. त्यापूर्वी तो भाग पाण्याने एकदा धुऊन घ्यावा. एका वेळी एकाच ठिकाणी थोडय़ा प्रमाणात हे लोशन लावावे. थोडय़ा वेळाने मायक्रो फायबर कापडाच्या साह्य़ाने हलक्या हातानिशी हे लोशन पुसावे. त्यानंतर तो भाग पुन्हा स्वच्छ धुऊन काढावा. याचा परिणाम बऱ्यापैकी जाणवतो. गाडीला चिकटून बसलेले कण निघून जाण्यात मदत होते, मात्र याचा वापर केल्यानंतर कार पॉलिश वापरल्यास त्याचा परिणाम अधिक दिसतो.

क्रीम पॉलिश

दररोजच्या वापराने किंवा एका जागी उभी राहिल्यानंतरही गाडीवर साचणाऱ्या धुळीमुळे तिची चमक नाहीशी होते. योग्यपणे धुऊनदेखील पूर्वीसारखी चमक दिसून येत नाही, मात्र क्रीम पॉलिशने ही चमक पुन्हा मिळवता येते. पॉलिश करण्यापूर्वी गाडी धुऊन आणि तिच्यावरील चिकट डाग हटवून घ्यावेत. त्यानंतर क्रीम पॉलिश लावावे. एका वेळी एका भागाचे पॉलिश करणे कधीही सोयीस्कर. क्रीम लावताना स्पंज गाडीच्या पृष्ठभागावर वक्राकार पद्धतीने फिरवावा लागतो. व्यवस्थित क्रीम लावल्यानंतर ती सुकू द्यावी व नंतर मऊ  कपडय़ाने तो भाग पुसून घ्यावा.

डॅशबोर्ड पॉलिश

गाडीच्या बाह्य़ भागाप्रमाणेच अंतर्गत भागाचीही स्वच्छता आवश्यक आहे. गाडीच्या सीट्सचे कव्हर काढून ते धुता येतात किंवा पायाजवळील भागातील रबराचे तुकडे काढून ते साफ करता येतात. मात्र दर्शनी भागात असलेल्या डॅशबोर्डची स्वच्छता हे जिकिरीचे काम आहे. रस्ताही डॅशबोर्ड पॉलिश कमी येऊ  शकते. डॅशबोर्डचा भाग कपडय़ाने पुसून स्वच्छ करून त्यावर पॉलिशचा थर चढवावा. पॉलिश लावलेला भाग काहीसा निसरडा होत असल्याने स्टीअरिंग, गीअर, ब्रेक, अ‍ॅक्सिलेटर अशा ठिकाणी तो लावू नका.

कार शॅम्पू

गाडी पाण्याने किंवा घरगुती साबण पावडरचा वापर करून धुतल्यानंतरही अनेकदा त्यावरील पॅचेस राहतात. डिझेलचा वापर करून हे डाग काढता येतात. मात्र त्यामुळे गाडीच्या रंगावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी कार शॅम्पू चांगला पर्याय ठरू शकतो. कार शॅम्पू दोन ते तीन लिटर पाण्यात मिसळून हलवून त्याचा फेस तयार करा. हा फेस स्पंजच्या साह्य़ाने गाडीच्या बाह्य़ भागावर व्यवस्थितपणे पसरवा. डाग असतील तेथे व्यवस्थित घासा. त्यानंतर पाण्याने धुऊन काढा. पृष्ठभागावर साचलेले पाणी कोरडय़ा मऊ  कपडय़ाने पुसून काढा. श्ॉम्पूमुळे गाडीच्या खालच्या बाजूस तसेच छोटय़ा छोटय़ा कोपऱ्यांमध्ये जमा झालेली धूळ, घाण निघून जाते, मात्र गाडीच्या कोपऱ्यांमध्ये लागलेले ग्रीस किंवा तेल घालवण्यासाठी दोन-तीनदा अशी धुलाई करावी लागते. गाडी स्वच्छ करताना कोरडा कापड आणि ओला कापड असे दोन वेगवेगळे फडके वापरा.