डॉ. अविनाश भोंडवे

कार्पल टनेल सिंड्रोम हा एक मनगट आणि त्यापुढील हाताचा एक वेदनादायी आजार असतो. आपल्या मनगटात छोटी-छोटी हाडे असतात, त्यास कार्पल बोन्स म्हणतात. त्या हाडांवरून काही अस्थिबंध आडवे जातात. त्यांना ‘ट्रान्सव्हर्सकार्पल लिगामेंट’ म्हणतात. हे अस्थिबंध कार्पल बोन्सवरून गेल्यामुळे एक बोगद्यासारखा पोकळ भाग निर्माण होतो. त्याला कार्पल टनेल म्हणतात.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

या बोगद्याच्या पोकळीतून हाताचा मुख्य मज्जातंतू (मेडियन नव्‍‌र्ह) आणि रक्तवाहिनी तळहाताकडे एकत्रितपणे जातात. हा मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या तळहातातून अंगठय़ाच्या खालील फुगीर भागात आणि अंगठय़ाच्या बाजूस असलेल्या तर्जनी, मध्यमा या दोन बोटांत आणि अनामिकेच्या अध्र्या भागात पसरलेल्या असतात. त्यामुळे या साडेतीन बोटांच्या संवेदना आणि रक्तपुरवठा कार्पल टनेलमधून होतो.

काही विशिष्ट कारणांनी हे अस्थिबंध दबले गेले तर साहजिकच त्याचा दबाव या मज्जातंतूवर आणि रक्तवाहिन्यांवर पडतो आणि मनगटे, तळहाताचा अर्धा भाग आणि ही साडेतीन बोटे यात अनेक त्रासदायक लक्षणे दिसू लागतात.

आजाराची कारणे

* संगणकाचा सातत्याने वापर- संगणकीय वापर जास्त प्रमाणात कराव्या लागणाऱ्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांमध्ये (आयटी क्षेत्र, शासकीय सेवेमधील लेखनिक, बँक कर्मचारी, बीपीओमधील कर्मचारी)

*  मोबाइलचा अतिवापर- एसएमएस, टेक्स्ट, गेम, समाजमाध्यमे यासाठी सतत मोबाइल वापरणारे तरुण.

*  संधिवातामुळे मनगटावर येणारी सूज

*  मनगटामध्ये होणाऱ्या गँगलिऑन गाठी- सांध्याच्या किंवा अस्थिबंधाच्या आवरणापासून ही गाठ होते. त्यात घट्ट असा द्राव असतो. या गँगलिऑनमुळे दबाव येतो.

*  रक्तातील युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे होणारा गाऊट आणि हायपर युरेसिमिया- वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडचे अतिरिक्त कण सांध्यात जमा होतात. त्याचे स्फटिक बनतात आणि मेडियन नव्‍‌र्हवर दबाव येतो.

* रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण खूप वाढणे.

*  संप्रेरकांच्या असमतोलामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) अंगावर येणारी सूज

* दुखापतीमुळे मनगटातील हाडे फ्रॅक्चर होऊन नंतर वेडीवाकडी जुळणे (मालयुनियन)

*  दुखापतीमुळे कार्पल टनेलमधून जाणाऱ्या मेडियन नव्‍‌र्हच्या आवरणात रक्तस्राव होणे.

उपचार-

*  काही काळ मनगटाला विश्रांती मिळावी म्हणून मनगटाची हालचाल रोखणारे स्प्लिंट २-३ आठवडे केले जाते.

*  सूज कमी करणारी काही वेदनाशामक औषधे, मज्जातंतूंची सूज कमी करणारी औषधे दिली जातात.

ल्ल  युरिक अ‍ॅसिड वाढलेले असल्यास त्यासाठी काही औषधोपचार केला जातो.

ल्ल प्रतिबंधक उपाय म्हणून संगणकावरील किंवा मोबाइलवरील टायपिंग बंद ठेवावे लागते.

ल्ल हाताची शक्ती कमी होत असल्यास, हाताला आणि बोटांना खूप वेदना होत असल्यास किंवा मुंग्या येत असल्यास, दुखापतीमध्ये मनगटाचे हाड सरकले गेले असेल, मज्जातंतूंच्या आवरणात रक्तस्र्राव झाला असल्यास, मनगटात गाऊटचे स्फटिक किंवा कॅल्शिअमचे खडे झाले असल्यास, गँगलिऑनच्या गाठी मनगटावर दबाव आणत असल्यास शस्त्रक्रिया करून कार्पल टनेलमधील मेडियन नव्‍‌र्ह मोकळी करावी लागते.

लक्षणे

* सुरुवातीला बोटांमध्ये थोडासा बधिरपणा येणे.

*  झोपलेले असताना अचानक बोटात कळा आणि मुंग्या येणे.

*  बोटे पूर्ण बधिर होणे.

*  बोटांची आग होणे.

*  सुया खुपल्यासारखे दुखणे. टोचल्यासारखे वाटणे.

*  मुंग्या आणि बधिरपणा जाण्यासाठी वारंवार हात झटकणे, हात चोळणे.

* तळहात नसल्याची भावना होणे.

* बोटांवर सूज आली नसतानाही सूज आल्यासारखे वाटणे.