दीपा पाटील

साहित्य

पाव किलो मटन खिमा, २ कांदे बारीक चिरलेले, १ चमचा पपईची पेस्ट, ८-९ लसूण पाकळ्या, १ इंच आले, कोथिंबीर, १ चमचा जिरेपूड, १ चमचा धनेपूड, १ चमचा गरम मसाला, १ चमचा तिखट, अर्धा चमचा मिरपूड, तेल, मीठ.

कृती

प्रथम एका भांडय़ात मटन खिमा घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, वाटलेले आले आणि लसूण, जिरेपूड, धनपूड, तिखट, मीठ, मिरपूड मिसळून घ्यावे. आता हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले भिजवून घ्यावे. आता फ्रिजमध्ये हे मिश्रण २-४ तास ठेवावे. त्यानंतर या मिश्रणाचे गोळे करावेत. तव्यावर तेल तापवून त्यात हे गोळे तेलावर खरपूस भाजून घ्यावेत. गरमागरम चपली कबाब पुदिन्याच्या चटणीसोबत खावेत.