22 November 2019

News Flash

परदेशी पक्वान्न : चीझी झुकिनी स्टिक्स

डाएटचे विविध प्रकार सध्या अतिशय लोकप्रिय आहेत. त्यातलाच एक म्हणजे केटो डाएट. असे डाएट करणाऱ्यांसाठी एक खास पाककृती देत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश लिमये

डाएटचे विविध प्रकार सध्या अतिशय लोकप्रिय आहेत. त्यातलाच एक म्हणजे केटो डाएट. असे डाएट करणाऱ्यांसाठी एक खास पाककृती देत आहे.

साहित्य

* कोथिंबीर

* ओरिगॅनो

* चिली फ्लेक्स

* १ झुकिनी

* १ अंडे

* २ चमचे बदाम पूड

* मीठ, मिरपूड

* १०० ग्राम चीझ.

कृती

झुकिनी आधी किसून घ्या. त्याचे पाणी गाळून घ्या. हे पाणी डाळीत किंवा कणीक भिजवण्यासाठी वापरता येईल. एका बाऊलमध्ये झुकिनी, अंडी, बदामाची पावडर एकत्र करा. मीठ, मिरपूड, कोथिंबीर, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स मिक्स करा. हे मिश्रण ओव्हन ट्रेवर थापून घ्या. वरून चीझ किसून घ्या. ओव्हनमध्ये ५-७ मिनिटे बेक करा. पिझ्झा कटरने कट करा.

First Published on June 13, 2019 12:31 am

Web Title: cheesy zucchini sticks recipe
Just Now!
X