|| शुभा प्रभू-साटम

साहित्य उकडून बारीक तुकडे केलेलं बोनलेस चिकन, थोडीशी मोहरी कुटून, २-४ लसूण पाकळ्या, मिरपूड, ड्राय हब्र्ज, मीठ आणि मेयोनीज, बटर किंवा चीझ यातील जे आवडत असेल ते.

कृती

  • मोहरी कुटून घ्यावी. एका वाटीत फेसून घ्यावी. यात लसणाच्या पाकळ्या ठेचून पुन्हा फेसावे. बाकीचे सर्व साहित्य एकत्र करावे. ब्रेडमध्ये हे मिश्रण भरून सँडविच करावे.
  • आता यात पुरवठय़ासाठी गाजर, कोबी, पालक या भाज्या बारीक चिरून किंवा उकडलेले मक्याचे दाणे, बटाटा हेसुद्धा घालता येईल. आवडत असेल तर सलाड आणि लेटय़ूसची पानेही चिरून घालता येतील. चिकनऐवजी उकडलेले अंडे घालूनही हे सँडविच करता येते.