19 November 2019

News Flash

चिकन पेरी पेरी

कांदा, मिरच्या चिरून घ्याव्यात. लसूण ठेचून घ्यावी आणि सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.

स्वादिष्ट सामिष : दीपा पाटील

साहित्य

चिकन लेग पीस, २ लाल सिमला मिरच्या, २ लाल साध्या मिरच्या, १ चमचा काश्मिरी लाल मिरची पूड, १ चमचा पॅप्रिका पूड, ७-८ लसूण पाकळ्या, २ चमचे व्हिनेगार, ४ चमचे ऑलिव्ह तेल, १ पांढरा कांदा, मीठ.

कृती

कांदा, मिरच्या चिरून घ्याव्यात. लसूण ठेचून घ्यावी आणि सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. ही तयार झालेली चटणी चिकन लेग पीसना लावून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी. यानंतर ग्रील पॅनवर हे लेग पीस दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे. कांद्यासोबत सव्‍‌र्ह करावे.

First Published on November 6, 2019 1:43 am

Web Title: chicken peri peri recipe akp 94
Just Now!
X