26 February 2021

News Flash

चिकनगुनिया

‘एडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकनगुनिया हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो.

‘एडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकनगुनिया हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो. त्यामुळे ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ होणे, भूक न लागणे, अतिशय थकवा येणे आदी लक्षणे दिसतात. ताप येऊन गेल्यावरही अनेक दिवस सांधेदुखी कायम राहते. थकवाही अधिक जाणवत असल्याने रुग्ण बरा झाला तरी काही दिवस आराम करणे गरजेचे आहे.

गेल्या काही वर्षांपासून सार्स, बर्ड फ्लू, डेंग्यू अशा रोगांच्या पंक्तीतच हा ‘चिकन गुनिया’ येऊन बसला आहे आणि पुन्हा एकदा त्याच्या प्रतिबंधासाठी आणि प्रतिकारासाठीही शासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे.  सध्या थैमान घालत असलेला चिकनगुनियाला आयुर्वेदात वातप्रधान ज्वर असे म्हणतात. प्रामुख्याने गुळवेल, काडेचिराईत अशा कडू द्रव्यांचा उपयोग करून हा विकार नियंत्रणात आणता येतो. महासुदर्शन चूर्ण, महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचाही उपयोग विशेषत: अंगदुखीवर अर्थातच योग्य आणि वैद्यकीय सल्लय़ाने घेतल्यास उपयोग होतो. नागरमोथा या वनस्पतीचाही चांगला परिणाम यामध्ये दिसतो. तापावर आयुर्वेदात औषधच नाही, असा एक सामान्य गैरसमज आहे. तो चुकीचा असून, योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली अशा रोगांवर अधिक चिकित्सा होणे आवश्यक आहे.

– वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

ayurvijay7@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:45 am

Web Title: chikungunya virus infection 3
Next Stories
1 त्रिकोणासन
2 व्हेज सँडविच
3 चेहऱ्यावरील वांग
Just Now!
X