News Flash

परदेशी  पक्वान्न : नाई वोन्ग बाओ

१०-१५ मिनिटे ते झाकून ठेवावे. यानंतर हाताने थोडेसे दाबून मोदकाच्या आकाराचे गोळे करावेत

नीलेश लिमये nilesh@chefneel.com

नाई वोन्ग बाओ हा चीनमधील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. एका वेगळ्या प्रकारातला चिनी मोदकच म्हणा ना.

साहित्य

२ वाटय़ा मैदा, १ वाटी कस्टर्ड पावडर / किंवा तुम्ही मोदकाचे सारणही वापरू शकता. १०० ग्राम बटर, २०० ग्राम साखर, १० ग्राम ड्राय यिस्ट, ५० ग्राम मिल्क पावडर.

कृती

सर्वात आधी कस्टर्ड बनवून घ्यावे. त्यासाठी बटर फेटून घ्या. बटर फेटताना ३ वेळा समप्रमाणात साखर घालून फेटावे. त्यात कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर एकत्र करून घ्यावी. हे मिश्रण घट्ट होईल. एका बाऊलमध्ये हे मिश्रण ठेवून डबल बॉयलरवर ठेवून वाफवून घ्यावे. वाफवताना मध्ये मध्ये काटय़ा-चमच्याने ते एकजीव करून घ्यावे. वाफवल्यानंतर ते गार करून घ्यावे.

पारीसाठी – कोमट पाण्यात यिस्ट भिजवून घ्यावे. ते मैद्यात मिसळून आणखी थोडे गरम पाणी घालून मऊसर मळून घ्यावे. १०-१५ मिनिटे ते झाकून ठेवावे. यानंतर हाताने थोडेसे दाबून मोदकाच्या आकाराचे गोळे करावेत. हे गोळे जाडसर लाटून घ्यावेत. त्यात कस्टर्डचे सारण किंवा मोदकाचे सारण भरून त्याला गोल आकार द्यावा. आता हे बन्स १० मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर मोदकपात्रात किंवा स्टीमरमध्ये ते १० मिनिटे वाफवून घ्यावेत. नंतर आंच बंद करून वाफेवर २ मिनिटे ठेवावे. हे बन्स आता छान मऊ मऊ झाले असतील. अशा या कापसासारख्या मऊ बन्सचा किंवा बाओचा आस्वाद घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:29 am

Web Title: china sweet dish nai wong bao recipe zws 70
Next Stories
1 शहरशेती : कलम
2 ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ची क्लृप्ती
3 घरातलं विज्ञान : तापमापी
Just Now!
X