नीलेश लिमये

नाताळ जवळ आलाय. मस्त गुलाबी थंडीत मिक्सड फ्रुट केक आणि हॉट चॉकलेटची धमाल काही वेगळीच असते. नाताळनिमित्त दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये चॉकलेट सलामी दिली तर छोटय़ा दोस्तांबरोबरच मोठेही खूश होतील.

कृती

बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या.अंडय़ाचे पिवळा बलक वेगळे फेटून त्यात एकजीव करा. त्यात कोको पावडर, टुटी फ्रुटी मिसळा आणि मिश्रण अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळा. रोल फ्रिजमध्ये तासभर ठेवा. थोडय़ा पिठीसाखरेत घोळवून पातळ काप करून सव्‍‌र्ह करा. नेहमीच्या चॉकलेटला उत्तम पर्याय होऊ  शकतो.

साहित्य

*  १०० ग्राम बटर, २०० ग्राम साखर, २ अंडय़ाचा पिवळा बलक, ५० ग्रॅम कोको पावडर, बदामाचे काप चवीनुसार, कुकीजचे तुकडे, टुटी- फ्रुटी