News Flash

सॅलड सदाबहार : क्रिसमस फ्रूट सॅलड

केळीच्या गोल गोल चकत्या करून घ्या. स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष नीट धुऊन पुसून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

शेफ नीलेश लिमये

हे सॅलड खास माझ्या बालमित्रांसाठी. आमच्या किड्स बुफेमध्ये आम्ही ते नेहमी वाढायचो. आज आपल्या छोटय़ा वाचकमित्रांसाठी..

साहित्य

*   १० स्ट्रॉबेरी

*   १० द्राक्षे

*   २ केळी,

*   १० मार्शमेलो.

ड्रेसिंग

*   १ चमचा लिंबाचा रस

*   १ चमचा मध.

कृती :

केळीच्या गोल गोल चकत्या करून घ्या. स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष नीट धुऊन पुसून घ्या. मार्शमेलो कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळतात. त्यात जिलेटिन असतं. तुम्ही जर शाकाहारी असाल तर मग सुतारफेणी (म्हातारीचे केस असं आपण गमतीने ज्याला म्हणतो ते) वापरू शकता. किंवा मग फेटलेलं क्रीमही वापरू शकता.

मार्शमेलो चौकोनी आकारात कापून घ्या. ड्रेसिंगसाठी लिंबूरस आणि मध छान एकत्र करून घ्या. आता टूथपिकला आधी द्राक्षे टोचून घ्या. मग केळं टोचा त्यावर स्ट्रॉबेरी आणि शेवटी मार्शमेलो लावा. आता वरून ड्रेसिंग घाला. या स्टिक्स थंडगार करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि पार्टी सुरू झाल्यावर गारेगार सव्‍‌र्ह करा. बच्चापार्टी नक्की खूश होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 3:06 am

Web Title: christmas fruit salad recipe
Next Stories
1 अपरिचित साल्हेर-मुल्हेर
2 दोन दिवस भटकंतीचे : कोल्हापूर
3 मस्त मॉकटेल : डाळिंब मोहितो
Just Now!
X