|| डॉ. नीलम रेडकर

ज्येष्ठ नागरिकांना थंडीच्या दिवसांत अंगदुखी, सांधेदुखी यांसह विविध आजारांना सामोरे जावे लागते. थंडीमुळे गुडघे, हात-पाय दुखतात, त्याशिवाय हृदयरोग, पक्षाघात हे विकारही बळावतात.

Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा

सांधेदुखी : हिवाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासात वाढ होते. हिवाळ्यात हवेतील बदलामुळे स्नायू, हाडे, लिगामेंटस व टेंडन यांमधील दाबही कमी-जास्त होतो. थंड तापमानामुळे सांध्यातील सायनोवियल फ्लुइड घट्ट होते. त्यामुळे शरीराची हालचाल करताना सांधे स्टिफ वाटतात.

काळजी

  • योग्य प्रमाणात व्यायाम करा.
  • वेदनाशामक गोळय़ा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या.
  • हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने डी जीवनसत्त्वाची कमतरता असते. त्यामुळे योग्य प्रमाणात डी जीवनसत्त्व असलेला आहार घ्यावा.
  • सतत दुखणाऱ्या सांध्यांकडे विशेष लक्ष द्या. हातमौजे, नी कॅप यांचा वापर करा. जास्त दुखत असल्याच गरम पाण्याचा शेक द्यावा.

हृदयरोग, पक्षाघात

हिवाळय़ात हृदयरोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात यांसारखे आजार बळावू शकतात. हिवाळ्यात कमी तापमानामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि रक्तवाहिन्या आंकुचित पावतात. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. हृदयाला व मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठय़ामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे हे आजार बळावतात.

काळजी :

  • ज्यांना हृदयाचा, उच्च रक्तदाबाचा व पक्षाघाताचा आजार आधीपासून आहे, त्यांनी नियमित औषध घेणे आवश्यक आहे.
  • छातीत दुखणे, दम लागणे, जीभ जड होणे, थकवा जाणवणे किंवा चक्कर येणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • शारीरिक तंदरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही चांगले ठेवणे जरूरचे आहे.

हिवाळय़ात ज्येष्ठ नागरिकांना निर्जलीकरणाचाही (डीहायड्रेशन) त्रास होऊ शकतो. वातावरणातील कमी तापमानामुळे तहान लागत नाही. त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. डीहायड्रेशनमुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे ही लक्षण दिसू शकतात. त्यामुळे हिवाळय़ात तहान कमी लागत असली तरी ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

हिवाळय़ात कोरडय़ात हवेमुळे आणि कमी तापमानामुळे त्वचेचेही आजार होतात. वय वाढल्यामुळे त्वचा आधीच शुष्क झालेली असते आणि हिवाळय़ात ती खूपच शुष्क होते. त्यामुळे शरीराला खाज येते. अंघोळीसाठी अतिगरम पाण्याचा वापर टाळा, कारण त्यामुळे त्वचा अधिकच कोरडी होते. नियमित मॉइसश्चरायझरचा वापर करा. ओठ कोरडे झाल्यामुळे ते फुटून रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे ओठांचीही काळजी घ्या. आंघोळीसाठी मॉइसश्चरयुक्त साबणाचा वापर करा.