नवीन कपडे खरेदी केले त्यावर मॅचिंग अ‍ॅक्सेसरीज हव्याच असतात. काही वेळा काही कपडय़ांचे रंग इतके वेगळे असतात की त्यावर तंतोतंत जुळणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज शोधणं अशक्य होतं.

अशा वेळी बाजारात खेपा घालत बसण्यापेक्षा घरीच अ‍ॅक्सेसरीज बनवता आल्या तर. केस बांधण्यासाठी वापरण्यात येणारा बो कसा बनवता येईल हे पाहू.

साहित्य : 

रंगीत सॅटिन पट्टी अध्र्या इंचाची, इलॅस्टिक दोरा, सुई, मोठा मोती, धातूची रिंग.

कृती

  • इलॅस्टिक दोरा सुईमध्ये ओवून घ्या.
  • अध्र्या इंचाच्या रंगीत सॅटिन पट्टीच्या मध्यातून धावदोऱ्यासारखा टाका घाला. पट्टी जवळ जवळ ओढून झालरीसारखा आकार द्या.
  • दोन वेढे येतील इतपतच रिबन घ्या व दोन्ही टोके शिवा.
  • मध्यावर अन्य एखाद्या रिबनचा बो बनवा आणि शिवा.
  • मोत्याच्या मण्याला मेटल रिंग जोडा व या छोटय़ा बोमध्ये अडकवा.
  • नव्या ड्रेसवर मॅचिंग बो घरच्या घरीच बनवा.

apac64kala@gmail.com