22 October 2019

News Flash

नवं काय? : क्रूज कण्ट्रोल सिस्टीम

कारने ४० किमी प्रति तास वेग गाठल्यानंतर ही प्रणाली कार्यान्वित करता येते

(संग्रहित छायाचित्र)

मिलिंद गांगल

आपल्या देशात वर्षांगणिक नवं नवीन गाडय़ा येत आहेत. तांत्रिकदृष्टय़ा प्रगत राष्ट्रांत निर्माण करण्यात आलेल्या या गाडय़ासुद्धा प्रगत असून आधुनिक सुविधांनी युक्त आहेत. आपला हा देश विकसनशील राष्ट्र असल्याने इतर अनेक क्षेत्रांतील उत्पादकांप्रमाणे वाहन उत्पादक आपल्या देशाकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहात आहे. नवनवीन सुविधा आपल्या वाहनात देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे क्रूज कंट्रोल.

कारने ४० किमी प्रति तास वेग गाठल्यानंतर ही प्रणाली कार्यान्वित करता येते. चालकाने लांब पल्ल्याचे ड्रायव्हिंग करताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग किंवा दिल्ली महामार्ग अथवा तुलनेत मोकळ्या रस्त्यावर वाहन चालवताना ठरावीक वेग निश्चित केल्यास (उदा. ५० किमी) तर कार त्या वेगाने (एक्सलेटरवर पाय न ठेवता) चालत राहते. ही प्रणाली वापरण्यासाठी स्टिअरिंग व्हीलवर एक लिव्हर अथवा स्टिअरिंगमध्ये पुरा कंट्रोल स्विच दिलेला असतात, कार क्रूज कंट्रोलद्वारे सेट केलेल्या वेगाने पुढे जात राहते अन् चालकाला सतत एक्सलेटर पेडलवर पाय ठेवावा लागत नाही.

क्रूज कंट्रोल मोडमध्ये कार पुढे जात असताना क्लच अथवा ब्रेक दाबल्यास गाडी क्रूज कंट्रोल मोडमधून बाहेर येते आणि आधीच्या वेगाने म्यॅन्युअल मोडवर चालू लागते. ही प्रणाली आपल्या देशात सध्या प्रत्येक वाहन उत्पादक त्यांच्या वाहनांच्या उच्च श्रेणीत देत आहेत.  लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकाला सतत एक्सलेटर पेडलवर पाय ठेवावा लागतो. विशिष्ट कोनात पाय एक्सलेटरवर ठेवून दाब द्यावा लागतो. क्रूज कंट्रोल या प्रणालीमुळे हा त्रास कमी करणे शक्य असते.

क्रूज : क्रूज कंट्रोल प्रणाली वापण्यासाठी क्रूज या नावाचे बटण दाबले असता इन्स्ट्रमेंट क्लस्टरवर ‘क्रूज’ असे दर्शवण्यात येते. जर आपल्याला तासाला ८० किमीचा वेग हवा असल्यास गाडी ८० किमी प्रति तास वेगापर्यंत नेऊन क्रूज बटण दाबावे लागते. त्यानंतर सेट हे बटण दाबायचे व एक्सलेटरवरील पाय काढून घ्यायचा म्हणजे आपण चालवत असलेले वाहन ८० किमी प्रति तास या वेगाने चालत राहील.

‘रिज्युम प्लस’ नावाचे बटण स्टेअरिंगवर असते. ८० किमी प्रति तासाहून अधिक वेग हवा असल्यास रिज्युम प्लस असे लिहिलेले बटन दाबायचे. सदर बटण एकदा दाबल्यास (१ मैल) १.६ किमीने वेग वाढेल. ८० किमी प्रति तासाहून अधिक वेग हवा असल्यास ‘रेस प्लस’ असे लिहिलेले बटण दाबायचे. सदर बटण एकदा दाबल्यास (१ मैल) १.६ किमीने वेग वाढेल. गाडी जोपर्यंत अपेक्षित वेग गाठत नाही, तोपर्यंत गाडीचा वेग वाढत राहतो.

सेट मायनस : सेट केलेला वेग कमी करायचा असल्यास ‘सेट मायनस’ हे बटण दाबून वेग कमी करणे शक्य असते.

कॅन्सल : कॅन्सल क्रूज कंट्रोल मोडमधून बाहेर येण्यासाठी क्लच किंवा ब्रेक पेडल दाबल्यास किंवा स्टेअरिंगवरील कॅन्सल बटण दाबल्यास क्रूज कंट्रोल प्रणालीमधून बाहेर पडता येते.

नॉर्मल क्रूज कंट्रोल मोड रस्त्यावर काही अडथळा दिसल्यास चालकाला ब्रेक दाबून वाहनाचा वेग कमी करावा लागतो. नॉर्मल क्रूज कंट्रोल स्वत:हून सेट केलेला वेग कमी अथवा जास्त करू शकत नाही. अडॅपटिव क्रुझ कंट्रोल ही प्रणाली वापरलेल्या वाहनात पुढील शो ग्रीलमध्ये एक रडार सेन्सर लावलेला असतो. या सेन्सरमधून गाडीच्या समोरील बाजूस रेडिओ लहरी  सोडल्या जातात. समोर एखादे वाहन सेट केलेल्या अंतराच्या आत आहे असे आढळल्यास गाडीचा वेग अडॅपटिव क्रुझ कंट्रोल प्रणाली स्वत:हून कमी करते. रस्ता मोकळा झाल्यावर सेट केलेल्या वेगाने गाडी पुन्हा चालू लागते. यासाठी चालकाने अपेक्षित वेग आणि दोन गाडय़ांमधील सुरक्षित अंतर सेट करायचे असते. रस्त्यावरील परिस्थितीनुसार गाडीचा वेग आपोआप कमी जास्त होतो. प्रसंगी चालकाने लेन चेंज करण्याचा प्रयत्न करताना एखादे सहजगत्या न दिसणारे वाहन असल्यास त्या संबधीची सूचनासुद्धा रडार सेन्सरद्वारे मिळते.  आपल्या देशात मात्र क्रूज कंट्रोलसारखी प्रणाली  प्रभावीपणे वापरण्यासाठी वाहनचालकांमध्ये किमान शिस्त आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याचे रस्ते, तसेच पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदलाची गरज आहे.

First Published on January 12, 2019 1:56 am

Web Title: cruise control system and how does it work in cars