घरात विविध समारंभांसाठी कागदी कप आणले जातात. कार्यक्रम झाल्यानंतर त्यातील काही कप उरतात. असे कप फेकून द्यावेसे वाटत नाहीत. काही वेळा आणलेल्या कपांपैकी काही थोडेसे फाटलेले असतात. त्यामुळे निरुपयोगी ठरतात. अशा कपांचा पुनर्वापर कसा करावा आणि त्यातून एक सुंदर, शोभिवंत बास्केट कसे तयार करावे, हे पाहू या..

साहित्य : कागदी कप, सुतळ, सुशोभीकरणाचे साहित्य (टिकल्या), गम (फेविबाँड)

कृती  : * कागदी कपाला गमच्या साहाय्याने गोलाकारात सुतळ चिकटवून घ्या. * पूर्ण वाळू द्या. त्यावर शोभेचे साहित्य व टिकल्या चिकटवा. * सुतळीचे तीन तुकडे करून तिपेडी वेणी तयार करा. * सुतळ गुंडाळलेल्या कपाच्या आतील बाजूस ही तिपेडी वेणी स्टेपल करा किंवा फेविबाँडने चिकटवा. बास्केट किंवा पिशवीचे बंद असतात त्याप्रमाणे ही वेणी चिकटवा. *  तयार झालेले छोटेसे बास्केट नीट वाळू द्या. * अशा प्रकारे कागदी गळके कप पुनर्वापरात आणता येतील. *  कोरडे खाद्यपदार्थ किंवा लहान आकारातील वस्तू ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

apac64kala@gmail.com