18 February 2018

News Flash

हसत खेळत कसरत : त्रिमितीय स्नायूंचा व्यायाम

अनेकदा ट्रायसेप्स दुखत असतात. मात्र हा व्यायाम केल्याने हे दुखणे थांबते.

 डॉ. अभिजीत जोशी  | Updated: February 14, 2018 3:02 AM

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

खांद्याच्या पुढील आणि मागील बाजूस जोडणाऱ्या स्नायूस त्रिमितीय स्नायू (डेल्टॉइड मसल) असे म्हणतात. या स्नायूच्या बळकटीसाठी हा व्यायाम करणे गरजेचे आहे. या व्यायामाने केवळ खांद्याचेच स्नायू नव्हे, तर कोपर आणि बाहूच्या मागील बाजूस असणारे स्नायूही (ट्रायसेप्स) मजबूत होतात. अनेकदा ट्रायसेप्स दुखत असतात. मात्र हा व्यायाम केल्याने हे दुखणे थांबते.

यानंतर बाटली हळूहळू वर उचला आणि पुन्हा खाली घ्या. (छायाचित्र : २) असे किमान १० वेळा करा. काही दिवसांनंतर त्याची संख्या वाढवू शकता. हा व्यायाम जलदगतीने करू नका, नाहीतर हात व खांदा दुखावू शकतो. व्यायाम हळूहळू करा.

हातात पाण्याने भरलेली बाटली घ्या. बाटली उलटय़ा बाजूने पकडून लघूकोनात खांद्याच्या बाजूला घ्या. (छायाचित्र : १)

 डॉ. अभिजीत जोशी dr.abhijit@gmail.com

First Published on February 14, 2018 3:02 am

Web Title: deltoid muscle exercise
  1. No Comments.