News Flash

परदेशी पक्वान्न : डिटॉक्स ज्यूस

बीट, गाजर, सफरचंद, काकडी, सेलरी किंवा अवाकाडो स्वच्छ धुऊन, पुसून घ्या.

परदेशी पक्वान्न : डिटॉक्स ज्यूस
(संग्रहित छायाचित्र)

नीलेश लिमये

साहित्य

*  १ बीट

*  १ गाजर

*  १ सफरचंद

*  १ काकडी

*  सेलरीचे देठ किंवा अवाकाडो

*  अर्धा लिंबू किंवा घरचे दही

*  मध

*  सैंधव मीठ

कृती :

बीट, गाजर, सफरचंद, काकडी, सेलरी किंवा अवाकाडो स्वच्छ धुऊन, पुसून घ्या. त्याच्या फोडी करून ज्यूसरमध्ये टाका आणि मस्तपैकी रस काढून घ्या. तुम्ही वेगवेगळा रस करून मग एकत्र करू शकता किंवा आधीच सगळ्या फोडी एकत्र करून त्याचा रस करू शकता. दही वापरणार असाल तर दही फेटून ते या रसात मिसळा. लिंबू वापरणार असाल तर लिंबू पिळून घाला. बिया मात्र आठवणीने काढून टाका. चवीसाठी सैंधव मीठ घाला आणि आवडीप्रमाणे मीठ घाला. हा थंडगार डिटॉक्स ज्यूस पिऊन दिवसाची प्रसन्न सुरुवात करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 12:36 am

Web Title: detox juices recipe abn 97
Next Stories
1 गरजूंचे गुरू
2 ‘पोदार’ सोडताना स्वत:साठी रडले..
3 स्वादिष्ट सामिष : बंगाली मस्टर्ड प्रॉन्झ करी
Just Now!
X