05 April 2020

News Flash

आहार उपचार

तुमचा नियमित आहार काय आहे, हे आहारतज्ज्ञ जाणून घेतात. प्रथिने, कबरेदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे अशा प्रकारचा चौरस आहार असणे आवश्यक आहे.

उपचारपद्धती

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे जरी म्हटले जात असले तरी किती आणि कोणत्या प्रकारचे अन्न घ्यावे याची माहिती असणे गरजेचे आहे. मधुमेह, उच्च किंवा कमी रक्तदाब आणि अन्य प्रकारच्या विकारांमध्ये आहार कसा घ्यावा, यासाठी आहार उपचार पद्धती जाणून घेणे आवश्यक आहे. या उपचारपद्धतीसाठी वैद्यकीय पदवी असलेल्या आहारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते.

तुमचा नियमित आहार काय आहे, हे आहारतज्ज्ञ जाणून घेतात. प्रथिने, कबरेदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे अशा प्रकारचा चौरस आहार असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थात काय घटक असतात याची माहिती आहारतज्ज्ञ देतात. कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे आणि कोणते पदार्थ टाळावे याची माहिती ते देतात. उदा. मधुमेह झालेल्यांना अधिक कबरेदके, शर्करा असलेले पदार्थ, फळे टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:02 am

Web Title: diet treatment high bp sugar akp 94
Next Stories
1 पीआरपी
2 डॉक्टर तुम्हीसुद्धा..
3 ‘भारत मानक ६’ कडे जाताना
Just Now!
X