News Flash

नवलाई : वेगळ्या प्रकारचा पंखा

उन्हाळ्याचा जाच कमी करण्यासाठी ‘फॅनझार्ट’ या भारतीय कंपनीने ‘मिस्ट फॅन’ बाजारात आणला आहे.

उन्हाळ्याचा जाच कमी करण्यासाठी ‘फॅनझार्ट’ या भारतीय कंपनीने ‘मिस्ट फॅन’ बाजारात आणला आहे. पंख्याचे वैशिष्टय़ म्हणजे यात पाण्याचा स्प्रे असल्यामूळे गारवा देणारे पाण्याचे तुषार तापमान आठ टक्क्यांपर्यंत कमी करतात. सामान्य कूलरपेक्षा हा वेगळा असून भिंतींवरदेखील अडकता येतो. ताकदवान मोटर असूनही अत्यंत शांत असल्यामूळे सामान्य कूलरप्रमाणे याचा आवाज होत नाही असा दावा कंपनीने केला आहे. एका जेट इंजिनच्या आकारामध्ये बनविण्यात आला असून पंख्याखाली चाके दिले असल्यामुळे इकडून तिकडे हलवण्यास आणि हाताळण्यास अगदी सोपा आहे.

ब्राव्हिआ ओएलईडीची सुरुवात

सुधारित काँट्रास्ट, रंग आणि स्पष्टपणा देणारी सोनी कंपनीची नवीन ‘ब्राव्हिआ ओएलईडी’ टीव्ही उत्पादनांची श्रेणी भारतात सादर झाली आहे. ‘ए८एफ’ नावाच्या या श्रेणीतील टीव्हींमधून ग्राहकांना ४के एचडीआर दर्जाच्या चित्रांचा आनंद घेता येणार आहे. ‘ए८एफ’ श्रेणीमध्ये ८० लाख ओएलईडींवर दृश्य टीव्हीच्या पडद्यावर उमटते. यातील अ‍ॅकास्टिक सरफेस तंत्रज्ञानामुळे थेट स्क्रीनमधूनच आवाज येतो, त्यामुळे सुंदर चित्रासोबत सुस्पष्ट आवाजही अनुभवयाला मिळतो. हा अँड्रॉइड ७.० या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्ट टीव्ही असून त्यात ‘गुगल प्ले’चा अ‍ॅक्सेसही पुरवण्यात आला आहे.

  • किंमत : ४,४९,९०० रुपये

म्युझिकबोट ब्ल्यूटूथ स्पीकर

म्युझिकबोट हा नवा छोटा, पोर्टेबल, ब्लूटूथ स्पीकर ‘पीट्रॉन’तर्फे सादर करण्यात आला. लहान उपकरणांशी किंवा टॅब्लेटशी म्युझिकबोट स्पीकर वायरलेस पद्धतीने सहज जोडता येतो. चार तास सलग आवाज ऐकवण्याची त्याची क्षमता असून याला चार्जिगसाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो.‘हॅण्ड्स-फ्री कॉलिंग’ची सुविधा असल्याने ‘म्युझिकबोट’मधून ‘कॉन्फरन्स कॉल’ घेता येतात. पीट्रॉन म्युझिकबोट हा काळ्या रंगात सादर झाला आहे.

  • किंमत : ६९९ रुपये

रॉयल एनफिल्डची पेगॅसस

रॉयल एनफिल्डच्या ‘मेड लाइक अ गन’ या स्थितिस्थापक  आणि टिकाऊ  वाहने तयार करण्याच्या परंपरेतून प्रेरणा घेत भारतात ‘पेगॅसस’ ही नवीन बुलेट दाखल करण्यात आली आहे. रॉयल एनफिल्डच्या ब्रिटनमधील कारखान्यात दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्माण करण्यात आलेल्या ‘आरई/डब्ल्यूडी १२५ फ्लायिंग फ्लिआ’ मोटरसायकलवरून प्रेरणा घेऊन ‘पेगॅसस’ तयार करण्यात आली आहे. या मोटरसायकलची जगभरात केवळ १००० युनिट्स उपलब्ध आहेत. भारतामध्ये सव्‍‌र्हिस ब्राऊन या युद्धाचा कालखंड दर्शवणाऱ्या रंगात या २५० मोटरसायकल्स आणल्या आहेत. या केवळ https://royalenfield.com/pegasus या वेबसाइटद्वारे १० जुलै २०१८ पासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. याशिवाय एक हेल्मेट आणि पेगॅसस कलेक्शनमधील एक टी-शर्टही यासोबत दिला जाणार आहे.

  • किंमत : २,४९,२१७ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:42 am

Web Title: different fans mist fan
Next Stories
1 फेकन्युज : ती ध्वनिचित्रफीत जनजागृतीसाठी
2 फेकन्युज : व्हॉटस्अ‍ॅप सेवा खंडित होणार नाही..
3 तरुण तंदुरुस्त
Just Now!
X