News Flash

डोबोस टोर्टे

डोबोस टोर्टे पेस्ट्रीमध्ये स्पाँज केकच्या सात थरांमध्ये बटर चॉकलेट क्रिमचे थर असतात.

प्रतिनिधी 

बुडापेस्ट या हंगेरीच्या राजधानीत व्हॅसी उक्टा (स्ट्रीट ) ही खाऊ गल्ली प्रसिद्ध आहे. गुलाश सूप आणि चिकन पॅपारिका या पारंपरिक हंगेरियन पदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर गोड पदार्थाने जेवणाची इतिश्री करण्यासाठी डेझर्टमध्ये एखादा हंगेरियन पदार्थ हवा असेल, तर डोबोस टोर्टे ही पेस्ट्री उत्तम पर्याय ठरते.

डोबोस टोर्टे पेस्ट्रीमध्ये स्पाँज केकच्या सात थरांमध्ये बटर चॉकलेट क्रिमचे थर असतात. वरून कॅरॅमल कस्टर्डचे टॉपिंग असते. पेस्ट्रीच्या बाहेरच्या बाजूला वॉलनट, चेस्ट नटचे तुकडे लावलेले असतात. चॉकलेटसाठी खास कोको पावडर वापरलेली असते. यामुळे ही पेस्ट्री खातानाच तोंडात विरघळत जाते.

शेफ जोसेफ डोबोस याने १८८५ मध्ये नॅशनल जनरल एक्झिबिशन ऑफ बुडापेस्टमध्ये हा पदार्थ प्रथम सादर केला. या प्रदर्शनाला हजर असलेल्या किंग फ्रांझ जोसेफ आणि राणी एलिझाबेथ यांनी हा पदार्थ खाल्ला. त्यांना तो आवडल्याने तो ‘रॉयल डिनर’चा भाग झाला.

त्या काळात रेफ्रिजरेटर नसल्यामुळे पेस्ट्रीज आणि केक जास्त काळ टिकवणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे केक दूरच्या बाजारांत पाठवून व्यवसाय वाढवणे शक्य नव्हते. त्यादृष्टीने प्रयत्न करताना डोबोसने ही पेस्ट्रीची रेसिपी शोधून काढली. फ्रान्समध्ये प्रवास करताना त्याला बटर क्रिमची कल्पना सुचली. चॉकलेट बटर क्रिम आणि केकवरील कॅरॅमलचा थर यामुळे पेस्ट्री जास्त दिवस टिकत असे. खास लाकडी खोक्यातून या पेस्ट्री सर्वदूर पाठवल्या जाऊ  लागल्या. खुद्द डोबोसने युरोपात फिरून पेस्ट्री तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली. आता बुडापेस्टमध्ये डोबोस टोर्टे सर्वत्र मिळत असला तरी बुडा किल्ल्याच्या भागातील काही जुन्या बेकऱ्यांमधील या पेस्ट्रीची चव मूळ पेस्ट्रीच्या जवळ जाणारी असते असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:30 am

Web Title: dobos torte pastries for dessert zws 70
Next Stories
1 परदेशी  पक्वान्न : नाई वोन्ग बाओ
2 शहरशेती : कलम
3 ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ची क्लृप्ती
Just Now!
X