22 February 2020

News Flash

प्रेमाचे ‘ड्रीम कॅचर’

सर्वप्रथम एका पांढऱ्या जाड कागदावर ‘हार्ट’च्या आकारातील लहान-मोठे तीन-चार तुकडे कापून घ्या.

|| घरातल्या घरात

आज व्हॅलेंटाइन्स डे. आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेमभावना व्यक्त करण्याचा दिवस. ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला आपण आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देतच असतो. त्यासाठी बाजारात विविध पर्यायही उपलब्ध असतात. मात्र, यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला अशी भेट देऊ शकता जी केवळ त्याला आवडेलच असे नाही तर त्याच्या हृदयाच्या जवळ आठवण बनून कायमस्वरूपी राहील. चला तर बनवू प्रेमाचे ‘ड्रीम कॅचर’.

साहित्य

  •  जांभळय़ा रंगाच्या वेगवेगळय़ा छटा असलेले ‘क्राफ्ट पेपर’
  •  चंदेरी रंगाचे ‘क्राफ्ट पेपर’
  •  चंदेरी रंगाची रिबिन किंवा ‘लेस’
  •  कशिदाकारीसाठी वापरण्यात येणारी रिंग
  •  कात्री ल्ल हॉट ग्लू

कृती

सर्वप्रथम एका पांढऱ्या जाड कागदावर ‘हार्ट’च्या आकारातील लहान-मोठे तीन-चार तुकडे कापून घ्या. या तुकडय़ांचा वापर करून जांभळय़ा तसेच चंदेरी कागदांवर ‘हार्ट’चे आकार कापून घ्या. रिबिनीचे नऊ ते १२ इंच आकाराचे तीन ते चार तुकडे करा. या तुकडय़ांवर ‘हार्ट’चे कापलेले आकार रंगसंगतीनुसार चिकटवा. आता कशिदाकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या रिंगला रिबिनीचे तुकडे चिकटवा. रिंगच्या दोन्ही बाजूला रिबिनीचे तुकडे बांधून घ्या. हे ‘ड्रीम कॅचर’ तुमच्या आवडत्या व्यक्तीला व्हॅलेंटाइन भेट म्हणून द्या.

First Published on February 14, 2020 12:03 am

Web Title: dream catcher of love akp 94
Next Stories
1 बोंबील चटणी
2 ताज महोत्सव
3 सुगंधित मोगरा