05 April 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : अंडा करी

प्रथम अंडी उकडून घ्यावी. ती सोलून त्यांना टूथपिकच्या साहाय्याने टोचून घ्या

दीपा पाटील

साहित्य

४ उकडलेली अंडी, २ चमचे अख्खा गरम मसाला, १ चमचा गरम मसाला पूड, २ चमचे मिरचीपूड, ३ चमचे धनेपूड, अर्धा चमचा बडीशोप पूड, ३ बारीक चिरलेले कांदे, ४ टोमॅटो किसून, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १ हिरवी मिरची, २ लाल मिरच्या, १ चमचा बेसन, कसुरी मेथी, ४ चमचे तेल

कृती

प्रथम अंडी उकडून घ्यावी. ती सोलून त्यांना टूथपिकच्या साहाय्याने टोचून घ्यावे. यानंतर ही अंडी तेलात लालसर तळून घ्यावीत. एका भांडय़ात तेल गरम करून आधी त्यात अख्खा गरम मसाला घालावा. नंतर बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो आणि मीठ घालून परतावे. यानंतर उरलेले सर्व मसाले, बेसन, कसुरी मेथी घालावी. या रश्शामध्ये शेवटी तळलेली अंडी घालून थोडा वेळ आचेवर ठेवावे. अंडा करी तयार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 4:00 am

Web Title: egg curry recipe egg gravy egg masala curry
Next Stories
1 हाडांची काळजी
2 सौंदर्यभान.. : सौंदर्याकडे लक्ष
3 आरोग्यदायी आहार : सोया ग्रॅन्युल्स उपमा
Just Now!
X