डॉ. अविनाश भोंडवे

शरीरातील एखाद्या अवयवातील पेशींची संख्या अनियंत्रित आणि अमर्याद प्रमाणात वाढणे म्हणजे कर्करोग होणे. गर्भाशयाच्या मुखाला होणारा कर्करोग हा गर्भाशय मुखाच्या पेशी जास्त वाढल्याने होतो.  स्त्रियांमध्ये  ४० ते ५० वर्षे वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते. हा कर्करोग १० ते २० वर्ष तो प्राथमिक स्थितीमध्ये असू शकतो.गर्भाशयाचा, बीजांडकोषाचा तसेच बीजनलिकेचादेखील कर्करोग स्त्रियांमध्ये आढळून येतात. अज्ञान आणि संकोच यामुळे बहुतांश वेळा स्त्रिया डॉक्टरकडे जाण्यास टाळाटाळ करतात. बहुसंख्यवेळा हा कर्करोग शेवटच्या पायरीवर गेलेला असताना त्याचे निदान होते.  डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

लक्षणे

* योनीमार्गातून मासिक पाळीव्यतिरिक्त रक्तस्राव होणे

*  सतत पांढरे पाणी अंगावरून जाणे

*  शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव होणे

*  ओटीपोटात दुखणे

*  गर्भाशयाच्या मुखाला मोठी गाठ असणे आणि त्यातून रक्तस्राव होणे

*  भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे,  कंबर, पाठ, पाय दुखणे, पाय सुजणे,    अशी लक्षणे दिसून येतात.

 कारणे

*  शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या ‘ह्य़ुमन पॅपिलोमा व्हायरस’ (एच.पी.व्ही.) या विषाणूचा संसर्ग झाल्याने

*  अतिप्रमाणात धूम्रपान करणे

*  कमी वयात शारीरिक संबंध येणे

*   जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध असणे

*  अधिक वेळा प्रसूती होणे

*  गर्भप्रतिबंधक गोळ्या दीर्घकाळ घेणे.

निदान

*  गर्भाशयमुखाचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला, तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच  तपासण्या आवश्यक.

*  पॅप स्मिअर- या चाचणीमध्ये सहजरीतीने कर्करोगाचे निदान केले जाते.    गर्भाशयमुखाचा कर्करोग पुढील दहा वर्षांत होण्याची संभाव्यताही यामध्ये वर्तविली जाते.  स्त्रियांनी विशिष्ट वयानंतर ही तपासणी नियमित करावी.

*  लिक्विड बेस्ड् सायटॉलॉजी तपासणीत   गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे निदान अधिक अचूक होते.

*  काल्पोस्कोपी- पॅप स्मिअर तपासणीत कर्करोगाचा संशय आल्यास काल्पोस्कोप नावाचे दुर्बिणीसारखे यंत्र वापरून ही तपासणी केली जाते.

*  बायॉप्सी- काल्पोस्कोपी दरम्यान गर्भाशयाच्या संशयास्पद भागाचा छोटा तुकडा काढून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.

 

प्रतिबंधक उपाय

*  प्रतिबंधक लस- ‘ह्य़ुमन पॅपिलोमा व्हायरस’ किंवा एचपीव्ही या विषाणूचा संसर्ग झाल्याने हा कर्करोग होण्याचा संभव असल्याने एचपीव्ही प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जवळपास ९३ टक्के स्त्रियांमध्ये याचा धोका टाळणे शक्य आहे. यासाठी  गार्डासील आणि सव्‍‌र्हीरीक्स असा दोन लस आहेत. याचे तीन डोस असतात. ते वयाचा नवव्या वर्षांपासून ते २६व्या वर्षांपर्यंत देता येतात. लस घेतली तरी नियमितपणे शारीरिक तपासणी आणि पॅप स्मिअर करणे गरजेचे असते.

*  वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करणे

*  २१ ते २९ वयाच्या मुलींची एचपीव्ही तपासणी करून घेणे. ती नकारात्मक आल्यास त्वरित लस घेणे. सकारात्मक आल्यास   शारीरिक तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.

*   वयाच्या २१ वर्षांनंतर मूल होऊ देणे.

*   शक्यतो दोन बालकांनंतर संततीनियमन करणे.

*   लैंगिक संबंधात कंडोमचा नित्य वापर करणे.

*   शारीरिक संबंधात नैतिकता पाळणे.

*   वयाच्या तिशीपासून दरवर्षी स्त्रीरोगविषयक शारीरिक तपासणी आणि दर तीन वर्षांनी पॅप स्मिअर नियमितपणे करणे.