खांद्याच्या मागील बाजूस असलेले स्नायू बळकट असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खांद्याची आणि हातांची हालचाल योग्य पद्धतीने होते.

कसे कराल?

हा व्यायाम करण्यासाठी थेराबँडचा वापर करावा. थेराबँडची दोनही टोके हातांनी पकडून ठेवा. आधी डावा हात वर करा. (छायाचित्रात पाहा) उजवा हात पुढच्या बाजूला घेऊन किंचित वर उचला. थेराबँडला थोडासा ताण द्या. आता उजवा हात वर करून डावा हात खाली घ्या. हा व्यायाम करताना खांद्याच्या मागील बाजूस थोडा ताण द्या. दोन्ही हात खाली-वर करण्याची क्रिया १० ते १५ वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवू शकता.

dr.abhijit@gmail.com