या व्यायामाने लॅटिसिमस डोर्सी मसल्स (पाठीच्या खालील बाजूस असलेले स्नायू) मजबूत होतात. डेल्टॉइड मसल आणि ट्रॅपेझिअस मसल्स (मानेच्या पाठीमागच्या बाजूला दोन खांद्यांमधील स्नायू) यांच्या बळकटीसाठीही हा व्यायाम महत्त्वाचा आहे.

कसे कराल?

* हातात चेंडू घेऊन खुर्चीत बसा. हात सरळ करून दोन्ही हातांनी चेंडूला दाब द्या. (छायाचित्र १ पाहा.)

*  हळूहळू चेंडू दोन्ही हातांनी वर न्या. हाता-कानांना समांतर असावेत. हात वर केल्यानंतरही चेंडूला दाब द्या. (छायाचित्र २ पाहा.) असे किमान १२ वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवू शकता.

 डॉ. अभिजीत जोशी : dr.abhijit@gmail.com