|| डॉ. अभिजीत जोशी

मनगटाच्या मागील बाजूस असलेले स्नायू बळकट करण्यासाठीचा व्यायामप्रकार आज आपण पाहणार आहोत. यासाठी ५०० मिलिलिटर पाण्याने भरलेली बाटली किंवा पाच पौंडाचे वजन यांचा वापर करता येईल.

कसे कराल?

सोफा किंवा खुर्चीवर ताठ बसा. पाण्याने भरलेली बाटली किंवा वजन हातात पकडा. हात कोपरापासून काटकोनात वाकवा. मनगटाची मागील बाजू वर आली पाहिजे आणि हात जमिनीला समांतर असावा. (छायाचित्रात पाहा)

आता हाताचा पंजा बाटलीसह वर-खाली फिरवा. अशा वेळी मनगट हलले नाही पाहिजे. खुर्ची किंवा सोफ्याच्या कठडय़ावर हात ठेवूनही हा व्यायाम करता येतो. या व्यायामामुळे मनगटाच्या मागील बाजूस असलेले स्नायू मजबूत होतात.

dr.abhijit@gmail.com