22 September 2020

News Flash

हसत खेळत कसरत : हाताच्या स्नायूंसाठी

खांदा, बाहू आणि हाताचे स्नायू मजबूत होण्यासाठी प्लँक टॅप्स हा व्यायाम केला जातो.

खांदा, बाहू आणि हाताचे स्नायू मजबूत होण्यासाठी प्लँक टॅप्स हा व्यायाम केला जातो. हा व्यायाम प्रकार सोपा असला तरी काळजीपूर्वक करावा लागतो.  एका हातावर शरीराचा भार येत असल्याने  या व्यायामामुळे हाताचे स्नायू बळकट होतात.

कसे कराल?

*      दोन्ही हात जमिनीला टेकवून आणि पाय मागे घेऊन जमिनीवर ओणवे उभे राहा. दोन्ही हातांमध्ये आणि पायांमध्ये काही अंतर ठेवा.

*       आता उजवा हात उचला आणि डाव्या खांद्यावर ठेवा. (यावेळी तुमच्या शरीराचा सर्व भार डाव्या हातावर असेल.) डाव्या खांद्यावरून हात काढून पूर्वस्थितीत या.

*      आता डावा हात उचलून उजव्या खांद्यावर ठेवा आणि तात्काळ पूर्वस्थितीत या. खांद्यांना हाताचा स्पर्श करताना श्वास सोडा.

*     असे पुन्हा पुन्हा करा. या व्यायामामुळे बाहू, खांदा आणि मनगटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि ते मजबूत होतात.

*      या व्यायामाने नितंब व पाठीचे स्नायू बळकट होण्यासही मदत होते. हा व्यायाम केल्याने पाठदुखीपासून मुक्ती मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 2:19 am

Web Title: exercises to improve hand mobility
Next Stories
1 सेल्फीस कारण की..
2 आक्रमक
3 सॅलड सदाबहार : सफरचंद आणि खसखस सॅलड
Just Now!
X