पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे. या व्यायामामुळे पोट आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. सुपरमॅन हवेमध्ये ज्या स्थितीत उडतो, तशाच प्रकारची स्थिती हा व्यायाम करताना होते, म्हणून या व्यायामप्रकाराला ‘सुपरमॅन एक्सरसाइज’ असे मजेशीर नाव आहे.

कसे कराल?

फचटईवर उपडे झोपा. (पोटावर) दोन्ही पाय एकमेकांना चिकटवा, मात्र दोन्ही हातांमध्ये अंतर ठेवा. हळूहळू दोन्ही पाय आणि हात वर उचला. मात्र पोट स्थिर राहिले पाहिजे. हात कानापर्यंत आले पाहिजे. अशा स्थितीत किमान दोन सेकंद राहा. हळूहळू श्वास सोडा. पाय आणि हात हळूहळू खाली घेऊन पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या. असे १० ते १५ वेळा करा.