हा खरे तर बहुउद्देशीय व्यायाम आहे. खांदा, छाती आणि हाताच्या कोपराच्या मागील बाजूस (एल्बो ट्रायसेप्स मसल्स) असलेल्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे.

कसे कराल?

घर किंवा कार्यालयातील एखाद्या भिंतीसमोर उभे राहा. भिंतीपासून शरीराचे अंतर सहा इंच असावे. दोन्ही हात भिंतीवर टेकवा. त्यानंतर छाती भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अशा वेळी हात मात्र एकाच जागी स्थिर राहून केवळ कोपर वाकले पाहिजेत. त्यानंतर पुन्हा छाती भिंतीपासून दूर करत आहे त्या स्थितीत या. हा व्यायाम करताना पाय मात्र आहे त्या जागीच स्थिर पाहिजेत.

– डॉ. अभिजीत जोशी : dr.abhijit@gmail.com