16 January 2021

News Flash

सौंदर्यभान : थ्रेड लिफ्ट/ फेस लिफ्ट

यामध्ये केले जाणारे थ्रेड लिफ्ट एक लोकप्रिय, अत्याधुनिक व कमी वेदनादायक आहे

डॉ. रिंकी कपूर

तुम्हाला चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या वाढत असल्याची चिंता सतावत आहे का? बोटॉक्स आणी फिलर्स यांसारखे खर्चीक उपचार उपलब्ध आहेत. पंरतु यापेक्षाही कमी खर्चीक आणि कमी वेदनादायक उपाय म्हणजे थ्रेड लिफ्ट किंवा फेस लिफ्ट.

थ्रेड लिफ्ट/ फेस लिफ्ट म्हणजे काय?

हे दोन प्रकारे केले जातात. सर्जिकल फेस लिफ्ट आणि नॉन सर्जिकल फेस लिफ्ट.

सर्जिकल फेस लिफ्ट : ही पारंपरिक पद्धत असून यात शस्त्रक्रियेद्वारे चेहऱ्यावरील सैल झालेली त्वचा काढून टाकतात. ज्यामुळे आतून त्वचा खेचली जाते. त्वचेला अधिक तरुण व नितळ बनवते. मात्र ही प्रक्रिया अधिक वेदनादायक आणि अधिक खर्चीक असून या प्रक्रियेनंतर पूर्णत: सुधारणा होण्यास वेळ लागतो.

नॉन सर्जिकल फेस लिफ्ट : यामध्ये केले जाणारे थ्रेड लिफ्ट एक लोकप्रिय, अत्याधुनिक व कमी वेदनादायक आहे. ही प्रक्रिया चेहऱ्यावरील बारीक रेषा व सुरकुत्या कमी करून चेहऱ्यावर उभारी आणण्यास मदत करते. या प्रक्रियेत विरघळणारे धागे लहान चिरेद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे त्वचेखाली घालतात. जे त्वचा ओढून घेतात. थ्रेड लिफ्ट शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेला उत्तेजित करून त्या भागात कोलॅजेन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक लवचीक व कोमल होते. थ्रेड लिफ्टचा परिणाम एक ते दीड वर्ष टिकतो.

फायदे : प्रक्रियेनंतर पूर्णत: सुधारणा होण्यास वेळ लागत नाही. (जास्तीत जास्त २४ तास.)

सर्जिकल फेस लिफ्टच्या तुलनेत चेहऱ्यावर कुठलाही व्रण येत नाही.

ही एक लंचटाइम प्रक्रिया आहे. (कमीतकमी कालावधीत होणारी.)

ही प्रक्रिया स्थानिक भूलअंतर्गत केली जाते.

घ्यावयाची  काळजी

’ पहिला आठवडा चेहऱ्यावर कुठलाही दबाव येणार नाही याची काळजी घ्यावी.

’ अन्न घेताना बारीक तुकडे करून घ्यावे किंवा द्रव पदार्थ असलेले जेवण घ्यावे.

’ दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही चेहऱ्यावर नियमित मेकअप लावू शकता.

दुष्परिणाम :

’ इंजेक्शनच्या जागी हलकी सूज येणे किंवा लालसर काळे डाग येणे.

’ त्वचेवर कोरडेपणा जाणवणे.

’ दृश्यभान गाठी आणि अडथळे येणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 4:09 am

Web Title: facelift surgery thread lift for facial rejuvenation zws 70
Next Stories
1 कोलंबी कैरी रसगोळी आमटी
2 नेक्सझू मोबिलिटीची ‘ई सायकल’
3 ‘मिशन ग्रीन कार’
Just Now!
X