News Flash

सण-उत्सवांसाठी सौंदर्य खुलवा!

. सण-उत्सवांत घरातील वातावरण प्रसन्न असते. या दिवसांत आकर्षक दिसावे असा सर्वाचाच प्रयत्न असतो.

|| डॉ. रिंकी कपूर

सण-उत्सव हे आपल्या देशाच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. सण-उत्सव हे केवळ धार्मिक कारणासाठी महत्त्वाचे नसतात, तर त्यानिमित्ताने नातेवाईकांशी भेटणे होते. नवीन कपडे, दागदागिने परिधान करून मिरवता येते.

सण-उत्सवांसाठी त्वचेचे सौंदर्य खुलवणेही महत्त्वाचे आहे. सण-उत्सवांत घरातील वातावरण प्रसन्न असते. या दिवसांत आकर्षक दिसावे असा सर्वाचाच प्रयत्न असतो. या दिवसांत त्वचा पटकन उजळ करण्यासाठी कोणत्या ‘लंच टाइम ट्रीटमेंट’ उपलब्ध आहेत, त्याचा एक आढावा आपण घेणार आहोत.

 • मायक्रोटरमॅब्रेसन किंवा स्किन पॉलिशिंग किंवा पार्टी फेशिअल हा सोपा व स्वस्त उपाय आहे. यात मृत त्वचेचा वरचा थर काढून टाकला जातो आणि खाली असलेली स्वच्छ त्वचा दिसू लागते. या फेस सेशनसाठी ३० मिनिटांचा कालावधी लागतो आणि ही प्रक्रिया हात, पाय आणि पाठीवरही करता येते. लग्नाआधी वधूची त्वचा उजळ करण्यासाठी हा उपाय करण्यात येतो. त्यामुळे १-२ दिवसांत मिळणारा उजळपणा आठवडाभर टिकतो. हा परिणाम अधिक काळ राहावा यासाठी कार्यक्रमाच्या आधी ३-४ आठवडय़ांपासून हा उपाय करावा.
 • इन्स्टंट ग्लो केमिकल पील्स- यात त्वचेला नैसर्गिक एक्सफॉलिअंटने रंगवतात, जे त्वचा तजेलदार करते आणि त्वचा अधिक उजळ करते. ग्लायकॉलिक, भोपळ्याचे पील्स, लॅक्टिक पील्स सुरक्षित असतात आणि ते २ ते ३ दिवसांत त्वचा उजळ करतात. येलो पील, सॅलिसायलिक, टीसीए इत्यादी उग्र पील्स दृश्य स्वरूपात जुनी त्वचा काढतात आणि हा परिणाम काही दिवस टिकून राहतो. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला दोन महिने शिल्लक असतील तर हा उत्तम उपाय असतो.
 • फोटोफेशिअल्स/ मेडिफेशिअल्स- हा सौम्य फेशिअलचा अधिक चांगला प्रकार आहे. यामुळे तात्पुरता उजळपणा प्राप्त होतो. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा पार्लरमधील फेशिअल क्रीममुळे ज्यांची त्वचा चुरचुरते त्यांच्यासाठी हा प्रकार अधिक सुरक्षित आहे.
 • एनडी यॅग लेझरने लेझर टोनिंग करणे हा या सेगमेंटमधील नवीन पर्याय आहे. प्रशिक्षित व्यक्तीने ही ट्रीटमेंट केली तर त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. या उपचाराने त्वचा लगेच स्वच्छ होते आणि तत्काळ उजळपणा मिळतो. वरील उपचारांपेक्षा हा थोडा खर्चीक उपाय आहे.
 • स्किन रिज्युव्हिनेशन कॉकटेलसह केलेली मेसोथेरपी आणि इलेक्ट्रोफोरेसिस हेही सुरक्षित उपचार आहेत आणि तात्पुरते चांगले परिणाम दिसून येतात.
 • बोटुलिनम टॉक्सिनने (बोटॉक्स) सुरकुत्या कमी करणे, फिलर इंजेक्शन आणि थ्रेड लिफ्ट्समुळे सुरकुत्या लगेच निघून जातात. बहुतेक सेलेब्रिटी याचा उपयोग करतात. कार्यक्रमाच्या २-३ आठवडय़ांपूर्वी हे उपचार करण्यात येतात आणि या उपचारांमुळे चेहऱ्यावरील वय अनेक वर्षांनी कमी होते.
 • स्किन टाइटनिंग, त्वचा टवटवीत करण्यासाठी लेझर ट्रीटमेंटही उपलब्ध आहे; पण या उपचारांचा परिणाम दिसण्यास काही दिवस किंवा काही आठवडे लागतात. यात ताबडतोब परिणाम दिसून येत नाही.

आहाराची कोणती  काळजी घ्यावी?

सण-उत्सवांच्या काळात मिठाई, पेये आणि फरसाण भरपूर खाल्ले जाते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, विशेषत: स्थूल असलेल्या व्यक्तींनी याकडे लक्ष द्यावे. भिजवलेला सुका मेवा, भाज्यांचे सलाड आणि ताजी फळे खाण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही किती कॅलरी घेतली त्यावर नजर ठेवा, जेणेकरून तुम्ही ती मर्यादा पार केली की लगेचच जाणीव होईल.

तुम्ही जे खाता ते तुमच्या त्वचेच्या माध्यमातून दिसते आणि पोटावरही दिसून येते. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. मिठाई, तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ नका.

देखभाल कशी करावी?

 • त्वचेवरील उपचार त्वचाविकारतज्ज्ञ किंवा प्रशिक्षित व्यावसायिकांकडून करवून घ्यावे.
 • बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शन, फिलर्स यांसारखे उपचार कार्यक्रमांच्या दोन दिवस आधी करणे हितावह असते
 • हे उपचार केल्यानंतर पाळावयाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते.
 • चांगल्या दर्जाचा मेकअप वापरा. झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ धुवा, मायसेलर पाण्याचा वापर करावा, विशेषत: संवेदनशील त्वचा असलेल्यांनी ते जरूर वापरावे.
 • दिवाळीसारख्या सणांच्या वेळी, जेव्हा वातावरणात धूळ आणि धूर असते तेव्हा ‘वेट वाइप्स’ जवळ बाळगावेत.
 • एखादा उपचार करण्याबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल संपूर्ण तपशील आधीच जाणून घ्या.
 • तुमच्या मित्र-मैत्रिणीवर एखादा उपचार परिणामकारक ठरला असला तरी तो तुमच्यासाठीसुद्धा योग्य असेलच असे नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

त्वचेच्या उजळपणासाठी काही घरगुती उपाय

 • दूध + मध : त्वचा तजेलदार आणि उजळ करण्यासाठी
 • गुलाबपाणी + मुलतानी : तेलकट त्वचेसाठी
 • ओट्स + हळद + मध : त्वचा पटकन टवटवीत करण्यासाठी
 • लिंबू पाणी + मध + कोरफड : निस्तेज त्वचेसाठी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 6:02 am

Web Title: festival beauty akp 94
Next Stories
1 वेगाचे वेड
2 सवलतींचा  ‘टॉप गिअर’
3 बुडापेस्टचे हमामखाने
Just Now!
X