खाद्यपदार्थ, कलाकारी, स्थानिक उत्पादने हे सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळणारे ठिकाण म्हणजे सरस म्हणजेच राजस्थानी महोत्सव. हा सरस ७ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत जोधपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सरसमध्ये एकाच छताखाली संपूर्ण राजस्थान अनुभवता येतो. राजस्थानच्या ग्रामीण

आजीविका विकास परिषदेमार्फत याचे आयोजन केले जाते. जोधपूर हे राजस्थानच्या पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे सर्व मार्गाने जोडलेले आहे.

सरसच्या आधी डुंगरपूर येथील प्राचीन बनेश्वर मंदिरात आदिवासींची जत्रा भरते. माघ शुक्ल पौर्णिमेला बनेश्वर मंदिराच्या परिसरात ही जत्रा भरते. भिल्ल जमातीत या जत्रेला खूपच महत्त्व आहे. माही आणि सोम नदीच्या संगमात स्नान करण्यासाठी गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथून भिल्ल येतात. याच वेळी वागड महोत्सवदेखील साजरा केला जातो.