डॉ. शुभांगी महाजन

आपल्या चेहऱ्याचा आकार आणि चेहऱ्यावरील त्वचेचे आरोग्य हे त्वचेखालील स्नायू, चरबी आणि हाडांची रचना यांवर अवलंबून असते. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावरील स्नायूंची जाडी आणि लवचीकता कमी होते आणि चरबीचे विघटन होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वृद्धत्वाच्या बऱ्याच दृश्यमान चिन्हांमध्ये वाढ होते. ही चिन्हे घालवण्यासाठी त्वचेची फिलर्स उपयोगी ठरतात.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

त्वचेचे फिलर म्हणजे काय?

त्वचेचे फिलर म्हणजे मऊ जेलसारखे पदार्थ असतात. जे त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिले जातात. ही फिलर इंजेक्शन विविध पदार्थापासून बनवता येतात. या वापरल्या जाणाऱ्या पदार्थात खालील संयुगांचा समावेश होतो.

हायल्युरॉनिक अ‍ॅसिड- हे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे संयुग आहे, जे त्वचेला टवटवीत आणि भारदस्त ठेवण्यात प्रमुख भूमिका निभावते.

कॅल्शियम हायड्रॉक्सिल अ‍ॅपॅटाईट

पॉली- एल- लॅक्टिक अ‍ॅसिड

पॉलीमेथिल- मिथॅक्राईलेट

ऑटोलॉगस फॅट- आपल्या शरीराच्या दुसऱ्या भागापासून ट्रान्सप्लान्ट केलेली चरबी.

या प्रत्येक संयुगाचे गुणधर्म आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम यांत भिन्नता आढळते. म्हणजे एखादे संयुग चेहऱ्याच्या विशिष्ट भागासाठी आणि इच्छित परिणाम देण्यासाठी अधिक किंवा कमी अनुकूल असू शकते. म्हणून स्वत:साठी कोणते फिलर सर्वोत्तम पर्याय असेल हे निर्धारित करण्यासाठी अनुभवी, चेहऱ्यावरील अवयवरचनांबद्दल सखोल ज्ञान असलेल्या सौंदर्यतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे.

उपयोग –

’ चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी.

’ डोळय़ांभोवतीची काळी वर्तुळे अािण सुरकुत्या कमी करण्यासाठी.

’ खोलवर आणि आत ओढले गेलेले (पोकळ) गाल भरून काढण्यासाठी.

’ चेहऱ्यावरील उथळ भागास उभारी देण्यासाठी.

’ पातळ ओठ जाड करण्यासाठी.

’ नाकाला योग्य तो आकार देण्यासाठी.

’ मुरुमांचे खड्डे भरून काढण्यासाठी.

दुष्परिणाम

’ फिलर इंजेक्शनच्या जागी लालसरपणा, जखम, रक्तस्राव किंवा सूज येऊ शकते.

’ असममितता (चेहऱ्याचे दोन्ही भाग समान न दिसणे)

’ चेहऱ्यावर गाठी दिसणे (एकाच ठिकाणी वाजवीपेक्षा जास्त फिलर इन्जेक्ट केल्याने)

’ त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे

’ डोळय़ांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये इंजेक्शन गेल्यास दृष्टिदोष होणे किंवा कायमस्वरुपी अंधत्व येणे.

’ रक्तवाहिनीमध्ये इंजेक्शन गेल्यामुळे त्या भागात रक्तप्रवाह थांबून त्वचापेशी मरण पावणे.