स्वादिष्ट सामिष

दीपा पाटील

साहित्य : काटे काढून साफ केलेले माशाचे तुकडे अर्धा किलो, २ चमचे आले-लसूण वाटलेले, १ चमचा धने-जिरे पूड, २ चमचे तिखट, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा लिंबूरस, २ चमचे कॉर्नफ्लावर, १ चमचे बेसन, २ चमचे मैदा, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, १ अंडे, तेल, मीठ.

कृती : मासे धुवून घ्यावेत. त्याला लिंबूरस आणि मीठ लावून ५ मिनिटे मुरत ठेवावे. त्यानंतर वाटलेले आले-लसूण, कोथिंबीर, तिखट, धनेजिरे पूड, मिरपूड, कॉर्नफ्लोअर, बेसन, मैदा एकत्र करावे. त्यात अंडे फोडून घालावे आणि हे मिश्रण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. यानंतर ते बाहेर काढून त्याचे टिक्केतयार करावेत. आणि तेलात तळून वरून चाटमसाला भुरभुरावा तसेच लिंबूरस घालून गरमागरम खायला द्यावेत.