News Flash

शहरशेती : गॅलरीतील देखणी फुले

बहुतेक फुलझाडे थंडीतच जास्त चांगली फुले देतात (अपवाद- झेंडू).थंडीत सुंदर फुले देणाऱ्या प्रमुख भारतीय फुलांची राणी ‘शेवंती’.

राजेंद्र श्रीकृष्ण भट

घराला गॅलरी आहे आणि त्यात फुलझाडे नाही, असे शक्यतो होत नाही. आपली गॅलरी विविध रंग-गंधांच्या फुलझाडांनी नेहमी बहरलेली असावी, असे प्रत्येकालाच वाटते. आपल्याकडे काही फुलझाडे विशिष्ट  हंगामातच फुलतात. अशी झाडे वर्षभर सांभाळावी जरी लागली तरी त्यांना जेव्हा फुले येतात तेव्हा ती अतिशय देखणी दिसतात व बागेची शोभा वाढवितात. यात काही भारतीय तर काही परदेशातील झाडे आहेत. अनेक वर्षे टिकणारी (एक्झोरा), कटिंगपासून परत परत वाढवता येणारी, अनेक वर्षे सातत्याने लागवड करता येणारी शेवंती, हंगामापुरती बिया लावून वाढणारी झाडे, असे प्रकार आहेत.

बहुतेक फुलझाडे थंडीतच जास्त चांगली फुले देतात (अपवाद- झेंडू).थंडीत सुंदर फुले देणाऱ्या प्रमुख भारतीय फुलांची राणी ‘शेवंती’. आज आपल्याकडे शेवंतीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. शेवंतीची झाडे छाटून (कटिंग करून) त्यापासून रोपे तयार करता येतात अथवा काही जातींची बियांपासूनसुद्धा लागवड करता येते. शेवंतीला फुले येण्यासाठी मोठय़ा रात्रीची आवश्यकता असते. कोरडे हवामान, कमी पाऊस शेवंतीस मानवतो. बऱ्याच जातींची फुले १५-२० दिवस सहज टिकतात. शक्यतो, कळ्या असलेली रोपे आणावीत. हवेतील गारवा, मोठी रात्र व योग्य पाणी हे शेवंतीच्या झाडांना फुले येण्यास मदत करणारे घटक आहेत. जास्त पावसाचा व जास्त तापमानाचा भाग सोडून बाकी सर्व भागांत ही झाडे वाढवता येतात. जास्त पाऊस व आद्र्रतेमुळे या झाडाला रोग होतात व बहुतेक वेळा झाडे मरतात. फुले येऊन गेल्यावर या झाडांची छाटणी करून रोपे तयार करता येतात. झाडांना कळ्या येताना आधाराची आवश्यकता असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:05 am

Web Title: flower farming in balcony
Next Stories
1 सुंदर माझं घर : लाकडी रंगीत फूल
2 सांगे वाटाडय़ा : एकटेच जाऊ भटकंतीला..
3 फेकन्युज : नेहरू संघाच्या शाखेत?
Just Now!
X