26 March 2019

News Flash

हसत खेळत कसरत : ‘सुप्रास्पिनॅट्स मसल्स’च्या मजबुतीसाठी..

खांद्याच्या पाठीमागील स्नायूच्या (सुप्रास्पिनॅट्स मसल्स) मजबुतीसाठी हा व्यायाम आवश्यक आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

खांद्याच्या पाठीमागील स्नायूच्या (सुप्रास्पिनॅट्स मसल्स) मजबुतीसाठी हा व्यायाम आवश्यक आहे.

कसे कराल?

१ ) पलंगाच्या एका बाजूला पोटावर झोपा. हात मात्र पलंगाबाहेर असतील, अशा स्थितीत ठेवा. खांद्यांना उशीचा आधार घ्या. (छायाचित्र १ पाहा.) हातात पाण्याने भरलेली बाटली पकडा. हे करताना हाताच्या पंजाची मागील बाजू समोर आली पाहिजे. हळूहळू खांदे वर उचला.

२ ) आता बाटलीसह हात पुढे घ्या. (छायाचित्र २ पाहा) आता पुन्हा खांदे वर उचला. असे करताना मात्र हाताचा कोपर आणि मनगटाचा सांधा यांची हालचाल करू नका. हा व्यायाम करताना जास्त जड वजन उचलू नका.

– डॉ. अभिजीत जोशी -dr.abhijit@gmail.com

First Published on March 14, 2018 2:40 am

Web Title: for the strengthening of supraspinatus muscles