|| दीपा पाटील

साहित्य

  • अर्धा किलो चिकन, मेथीची जुडी, १ कप फेटलेले दही, अर्धा कप दूध, अर्धा कप साय, २ चमचे तेल.
  • वाटणासाठी – १ मोठा कांदा, लसूण पाकळ्या, आले, ३-४ हिरव्या मिरच्या, २ चमचे धनेपूड, १ चमचा गरम मसाला.
  • फोडणीसाठी १ चमचा तूप आणि २ लाल मिरच्या.

कृती :

  • वाटणासाठीचे साहित्य एकत्र वाटून घ्या. आता भांडय़ात तेल गरम करून त्यात हे वाटण परता. त्यात चिकन, मेथी, दही आणि दूध घालून शिजवून घ्या. शिजल्यावर शेवटी साय घालून गॅस बंद करा.
  • तूप गरम करा त्यात मिरच्या घालून तडतडू द्या. आता हे फोडणी चिकनवर ओता.
  • हे मेथी चिकन पोळी किंवा पराठय़ाबरोबर फस्त करा.