20 March 2018

News Flash

मस्त मॉकटेल : फ्रोजन कैरी पन्हे

ज्या ग्लासातून हे पन्हे देणार आहात त्याच्या कडांवर लिंबाची साल जरा पिळून घ्या.

अद्वय सरदेसाई | Updated: March 14, 2018 2:34 AM

साहित्य

कैरीचा गर ६० मिली, लिंबाचा रस २० मिली, ३-४ पुदिन्याची पाने, बर्फ, चिमूटभर आमचूर पावडर, सोडा.

कृती

दोन मोठे चमचे बर्फ घ्या. एका ब्लेंडरमध्ये तो घाला. त्यामध्ये कैरीचा गर, लिंबू रस, पुदिन्याची पाने आणि सोडा घाला. छानपैकी ते एकत्र करून फिरवून घ्या. ज्या ग्लासातून हे पन्हे देणार आहात त्याच्या कडांवर लिंबाची साल जरा पिळून घ्या. त्यावर आमचूर पावडर भुरभुरा आणि मग ब्लेंडरमधील मिश्रण ग्लासात ओता. थंडगार प्या.

First Published on March 14, 2018 2:34 am

Web Title: frozen raw mango lemonade mocktail recipe
  1. No Comments.