उत्सवाचे पर्यटन

Ministry of Railways has Released f frequently asked questions for RPF Constable Vacancy 2024 Must Read
RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

तब्बल पाचशे वर्षांची परंपरा असलेला गोवा कार्निवल म्हणजे गोवेकरांची शानच म्हणावा असा उत्सव. तीन ते चार दिवस संपूर्ण गोव्यामध्ये साजरा होणारा हा उत्सव. ख्रिश्चन धर्मीयांच्या पवित्र अशा लेन्ट पीरिअडच्या आधी हा उत्सव साजरा होतो. पणजी, म्हापसा, वास्को आणि मार्मगोवा या चार ठिकाणी मुख्यत: कार्निवलच्या विशेष परेडचे आयोजन केलेले असते. त्याशिवाय कलंगुट, कन्डोलिम या ठिकाणीदेखील परेडचे आयोजन होते.

ब्राझीलमध्ये साजऱ्या होणाऱ्या कार्निवलशी याची तुलना अनेक जण करतात. अर्थात त्याचे स्वरूप एकच असले तरी आवाका मर्यादित असतो. रंगीबेरंगी कपडय़ांचा साज चढवून, विविध देखाव्यांनी सजलेले फ्लोट आणि संगीत असा एकत्रित परिणाम या परेडमध्ये अनुभवायला मिळतो. यावर्षी कार्निवलच्या विशेष परेड २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पणजी, मार्मगोवा, वास्को आणि म्हापसा येथे प्रत्येकी एका दिवशी होतील. या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात परेडची प्रचंड गर्दी असल्यामुळे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर केलेली असते. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. गोव्यातील पोर्तुगीजांच्या वास्तव्याची आठवण हा उत्सव करून देतो. सुरुवातीला यावर पोर्तुगीजांची छाप होती, मात्र १९६१ नंतर तो खास गोवन शैलीत साजरा केला जातो. गोव्यात याच काळात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान फूड आणि कल्चर उत्सवाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास दोन्ही उत्सवांचा आनंद घेता येईल.