30 March 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : गोव्याची चिकन सागोती

चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून स्वच्छ धुऊन त्याला मीठ लावून बाजूला ठेवून द्या.

दीपा पाटील

साहित्य

अर्धा किलो चिकन, २ चमचे चिंचेचा कोळ,२ चमचे तेल, मीठ.

सागोती मसाला – १ मोठा कांदा, २ चमचे खसखस, ८ काश्मिरी सुक्या मिरच्या, अर्धा नारळ खोवलेला, ४-५ लवंगा, १ इंच दालचिनी, १५ काळीमिरी, दीड चमचा जिरे, दीड चमचा धने, १ चमचा बडिशेप, १ चमचा हळद, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा मेथी दाणे, ८ लसूण पाकळ्या, दीड इंच आले, अर्धा चमचा तेल.

कृती

चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून स्वच्छ धुऊन त्याला मीठ लावून बाजूला ठेवून द्या.

कांदा उभा चिरून घ्या. अर्धा चमचा तेल गरम करा. त्यात कांदा, लसूण, आले परतून घ्या. यानंतर त्यात खोवलेला नारळ घालून परता. हे मिश्रण थंड होऊ द्या.

आता याच भांडय़ात काश्मिरी मिरच्या, खसखस, लवंग, दालचिनी, जिरे, धने, बडिशेप, मेथीदाणे परता. त्यातचे आले-लसूण घालून परता. आता हे मिश्रणही थंड करायला ठेवा. आता दोन्ही मसाले एकत्र करून वाटा.

भांडय़ात २ चमचे तेल गरम करा. त्यात वाटलेला मसाला परता. त्यावर चिकन घालून तेही परता. यानंतर त्यात चिंचेचा कोळ आणि थोडे पाणी घाला. आता ५-१० मिनिटे शिजवा. चिकन व्यवस्थित शिजत आले की वरून कोथिंबिर घालून गॅस बंद करा.

ही गोवन चिकन सागोती भाताबरोबर नाहीतर पावाबरोबर मस्तपैकी फस्त करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2019 3:48 am

Web Title: goan chicken xacuti recipe for loksatta readers
Next Stories
1 आरोग्यदायी सफर
2 आजारांचे कुतूहल : अर्धागवायू
3 आरोग्यदायी आहार : जव-रवा इडली
Just Now!
X