बापू बैलकर

इंटरनेटच्या ‘फोर जी’ सेवेमुळे आपला मोबाईल फोनमध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. मोबाइलची ही कनेक्टीव्हीटी आता वाहनांमध्येही वाढू लागली आहे. मोटारी देखील आधुनिक होत आहेत. त्या चालकाशी बोलू लागल्या आहेत. गुगलने तर ‘स्वयंचलीत कार’ विकसीत केली आहे. पुढील काळात ही सेवा भारतातही येईल. गेल्या वर्षभरात या कनेक्टीव्हीटी असलेल्या कार भारतीय बाजारात आल्या असून त्यांनी तंत्रस्नेही वर्गाच्या आकांक्षांना गवसणी घातली आहे.

‘नजर हटी दुर्घटना घटी..’ रस्ते अपघातातील एक महत्वाचे कारण.  वाहन चालविताना चालकाचे लक्ष विचलीत झाल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यात गाडी चालवताना वातनुकूलीन यंत्रणा चालू बंद करणे, संगीत सुरू करणे, गाडीच्या काचा चालू बंद करणे, माबाईलवर बोलणे यामुळे वाहनचालकांचे गाडी चालवताना लक्ष विचलीत होत असते. यामुळे वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करीत गेल्या वर्षभरात काही प्रयोग कले आहेत.

गुगलने वर्षभरापूर्वी ‘स्वयंचलीत कार’ची घोषणा केली आहे. कधीकाळी स्वप्न वाटणारी ही कार डिसेंबर २०१८ मध्ये अमेरिकेतील फिनिक्स शहरात सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा काही ठराविक लोकांपर्यंत मर्यादीत असली तरी आज लोक प्रवास करण्यासाठी यंत्रमानवाला पैसै देत आहेत ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. या गडीत पाच यंत्रणा एकत्र येऊन काम करतात. कॉम्प्युटर व्हीजन, सेन्सर फ्युजन, लोकलायझ्शेन, रस्ते नियोजन आणि नियंत्रण. यात गाडी स्वताहून गाडीचे स्टेअरिगं हाताळते, ब्रेक दाबते, वेग कमी जास्त करते व इच्छिातस्थळी पोहचवते.त्यामुळे मोठय़ा कार कंपन्या व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या  स्वयंचलीत मोटारीकडे गांभीर्याने पहात असून आपल्याकडेही हे तंत्रज्ञान आज ना उद्या येईलच. भारतात ५जी कनेक्टिव्हिटीच्या आगमनानंतर यात नवीन, अभूतपूर्व सुविधा दाखल होतील आणि वाहन चालविण्याचा एक वेगळाच अनुभव येईल.

सध्याचा काळ हा कनेक्टीव्हीटीचा आहे. आपण इंटरनेटशी सतत जोडले जात आहे. आपला फोन, सांगणक, घडय़ाळ आाणि आता गाडी देखील इंटरनेटशी जोडली गेली आहे.  बदलत्या काळानुसार मोटारी देखील अत्याधुनिक होत आहेत. कीलेस एन्ट्री, सेंट्रल इन्फोटेटेन्मेंट, इंटरनेट कनेक्टीव्हीटी अशा कित्येक अत्याधुनिक सुविधा आता कारमध्ये उपलबध होत आहेत. मोटार कंपन्यांनी या कनेक्टीव्हीटी जोडलेली वाहने गेल्या वर्षभरात बाजारात आणली आणि वाहन उद्योगात मंदी असतानाही त्यांनी तग धरल्याचे दिसून आले. नवीन तंत्रज्ञानानुसार अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.

यात जूनमध्ये प्रदर्शित झालेली मॉरिस गॅरेजसची एमजी हेक्टर, मे मध्ये प्रदर्शीत झालेली ह्युंदाईची व्हेन्यू आणि जानेवारीत आलेली निसानची किक आणि आता भारतीय़ ग्राहकांना भूरळ घालत असलेली किआ सेल्टोस. या सर्व वाहनांचे एक वैशिष्ट आहे, ते म्हणजे कनेक्टीव्हीटी.  हे तंत्रज्ञान कारची चोरीपासून सुरक्षा तर करतेच शिवाय वाहनचालकालाही सुरक्षेची हमी देते.

एमजी हेक्टरने ‘आयस्मार्ट नेक्स्ट जेन’, ह्युंदाई व्हेन्यूने ‘ब्लूलिंक’, निसान किक्सने ‘निसान कनेक्ट’ तर किआ सेल्टासने ‘युव्हीओ’ या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

आयस्मार्ट नेक्स्ट जेन

एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) ने ‘आयस्मार्ट नेक्स्ट जेन’च्या प्रदर्शनाने भारतात एक अभूतपूर्व असे तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्राने विकसीत केलेली एमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरनेट कार आहे. ती ‘कनेक्टेड मोबिलिटी’चे मूर्त स्वरूप आहे. त्यांचे अद्भूत असे वैशिष्टय़ म्हणजे ‘व्हॉइस असिस्ट’. जे क्लाउड आणि हेड युनिटवर चालते. विशेष करून भारतासाठी भारतीय उच्चारांनुसार बनवले आहे. व्हॉइस असिस्ट ‘हॅलो एमजी’ म्हटल्याने सक्रिय होते व १०० सूचना पाळते. ज्यात खिडक्या आणि सनरूफ उघडणे किंवा बंद करणे, एसी नियंत्रण, नेव्हिगेशन, इ.चा समावेश आहे. तसेच, ते कनेक्टिव्हिटी क्षीण असली तरी

काम करते. प्रत्येक वेळी अ‍ॅप सुरू केल्यानंतर कार स्कॅन केली जाते आणि कारचे लोकेशन, टायरमधील प्रेशर किंवा दार लॉक झालेले आहे की नाही अशा प्रकारची तपासणी सुविधा त्यात आहे. चालक दरवाजे थेट लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि एअर कंडिशनर सुरू करण्यासाठी रिमोट अ‍ॅप वापरू शकतात. भारतातील हवामान परिस्थितीत हे खूप उपयोगी आहे. हे मालकाला गाडीच्या देखभालीच्या वेळीही सतर्क करते.